पहील्यांदाच नाशिक जिल्हा असोसिएशनची धुरा महिला सांभाळणार

नाशिक : देशात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशनच्या अर्थात एनआयएमए नाशिक जिल्हाच्या वर्ष २०१८-२०२० या दोन वर्षासाठी असलेल्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न होत आहे. सदरचा पदग्रहण सोहळा आज दिनांक १६ डिसेंबर, रविवार २०१८ रोजी रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे सायंकाळी ५ वाजता पार पडणार होणार आहे. नवीन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. जयश्री सूर्यवंशी तर सचिव पदासाठी डॉ. वैभव दातरंगे आणि खजिनदार पदासाठी डॉ. प्रतिभा वाघ शपथ घेणार आहे. यावेळी महाराष्ट्र पोलीस अॅकेडमीच्या संचालिका अस्वती दोरजे, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे, आणि प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या व नाशिक महापालिकेच्या प्रभाग पश्चिम समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
देशात आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या आधुनिक औषधी आणि प्राचीन भारतीय औषधशास्त्राचे वैज्ञानिक एकत्रीकरण करण्यासाठी एनआयएमएची स्थापना केली गेली. या असोसिएशनमार्फत कायमच सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांमधून लोकांपर्यंत आयुर्वेदातील विविध उपचार पद्धती पोहोचवल्या जातात. सोबतच गरजूंना शिबिर, कार्यशाळा आदीच्या माध्यमातून आवश्यक उपचार, मार्गदर्शन केले जाते. विशेष करून ग्रामीण भागात काम करणाऱ्यावर असोसिएशन अधिक भर असतो. सोबतच या क्षेत्रातील नवनवे बदल, अभ्यास समाजापर्यत पोहोचले जातात. लोकांमध्ये आरोग्यविषयी जनजागृतीचे काम केले जाते. हाच समाज सेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांच्या कामाच्या अंमलबजावणीकरीता वर्ष २०१८-२०२० साठी निवड करण्यात आलेली नूतन कार्यकारीणी पदभार स्विकारणार आहे. यंदा पहील्यांदाच असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची धुरा डॉ जयश्री सूर्यवंशी यांच्या रुपात महिला सांभाळणार आहे.
यावेळी जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व सदस्य शपथ घेतली. यात महिला फोरम आणि विद्यार्थी फोरमचे अध्यक्षही शपथ घेणार आहेत. पदग्रहण सोहळ्यासाठी डॉ. शैलेश निकम, डॉ. मनीष जोशी, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ.अनिल निकम, डॉ.भूषण वाणी, डॉ.प्रणिता गुजराथी, डॉ.राहुल पगार, डॉ. मनीष हिरे ,डॉ. व्यंकटेश पाटील, डॉ. सुजीत सुराणा आणि डॉ. देवेद्र बच्छाव यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित राहणार आहे.