ylliX - Online Advertising Network

Gold corona mask nashik नाशिकच्या ‘गोल्डन मॅन’चा मास्कही गोल्डन : video

सोन्याच्या दागिन्यांची भारी हौस असलेल्या नाशिकच्या मकरंद साळी यांनी 32 वर्षात थोडे-थोडे सोने खरेदी करीत ‘गोल्डन मॅन’ अशी ओळख मिळवली आहे. ते अंगावर 80 तोळ्यांचे दागिने घालतात. त्यांच्या सुवर्ण संचयात सोनेरी मास्कची भर पडली आहे. Gold corona mask nashik

त्यांनी चक्क साडेतीन तोळ्यांची सोनेरी फ्रेम असलेला दोन लाख दहा हजारांचा मास्क तयार केल्याने ते चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र, स्वत:च्या हौसेपलीकडेही त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक भान राखून गरीबांना मोफत सात हजार कापडी मास्क वाटले आहेत.

मूळ भगूरचे मकरंद वासुदेव साळी यांचे सातपूरला दी बाबाज् मेन्स वेअर व टेलरींग दुकान आहे. लहानपणापासूनच सोन्याची आवड असल्याने त्यांनी टेलरींगकडे वळल्यानंतर थोडी-थोडी सोने खरेदी सुरू केली. सन 1988 ला तोळ्याचा भाव तीन हजार रूपये होता, तेव्हापासून ते सोने घेत आहेत. आता त्यांच्याकडे 80 तोळे सोने आहे. सोन्याच्या अंगठ्या, चेन, ब्रेसलेट, घड्याळ अशा सोनेरी अवतारात ते कायम नजरेस पडतात. त्यामुळे सातपूर भागात गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख झाली आहे. Gold corona mask nashik

सातपूर चा गोल्डन मॅन म्हणून परिचीत असलेले मकरंद साळी यांना अंगावर विविध प्रकारचे सोन्याचे दागीने घालायला खुपच आवडते. त्यानी आतापर्यंत किमान साडेतीन किलोचे गळ्यातील साखळ्यां, कडे, अंगठ्या आदी वस्तू रोज ते वापरतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी सातपूर मधीलच दंडगव्हाळ सुवर्ण पिढीतून तब्बल दोन लाख दहा हजार रूपयाचा मास्क तयार केला आहे. या गोल्डन मास्कमुळे पुन्हा एकदा सातपूरच्या बाबा टेलर्सची चर्चा सुरू झाली आहे. हा मास्क गोविंद दंडगव्हाळ,सातपूर ता सुवर्णपेढीने ( पावणेचार तोळे ) सोने वापरुन तयार केला. 

सोन्याचा प्रवास कसा झाला ऐका त्यांच्या तोंडून :

Nashik golden man gold mask

Nashik golden man gold mask नाशिकचा गोल्ड मॅन सोन्याच्या दागिन्यांची भारी हौस असलेल्यानाशिकच्या सातपूर येथील मकरंद साळी यांनी 32 वर्षात थोडे-थोडेसोने खरेदी करीत ‘गोल्डन मॅन' अशी ओळखमिळवली आहे, ते अंगावर 80 तोळ्यांचे दागिनेघालतात. त्यांच्या सुवर्ण संचयात सोनेरी मास्कचीभर पडली आहे. त्यांनी चक्क साडेतीन तोळ्यांचीसोनेरी फ्रेम असलेला दोन लाख दहा हजारांचा मास्कतयार केल्याने ते चर्चेचा विषय ठरले आहेत.मात्र, स्वत:च्या हौसेपलीकडेही त्यांनी कोरोनाच्यासंकटकाळात सामाजिक भान राखून गरीबांनामोफत सात हजार कापडी मास्क वाटले आहेत.#nashikonweb #nashiknews #nashik #GoldeMask

Dikirim oleh Nashik On Web pada Selasa, 18 Agustus 2020

तुम्हाला नाशिकच्या बातम्या हव्या आहेत. सोबतच जिल्हा आणि शहरातील कोरोना स्थिती जाणून घ्यायची आहे. मग आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.