ylliX - Online Advertising Network

NashikOnWeb Impact स्थायी ने दिले शहरातील खड्डे बुजवण्याचे आदेश

नाशिकचे डिजिटल वेब पोर्टल असलेल्या Nashikonweb.com ने फेसबुक या सोशल साईटवर मनपावर केलेल्या जोरदार टीकेमुळे, मनपा शेवटी जागी झाली आहे. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती यांनी अधिकारी वर्गाची बैठक घेतली आणि शहरातील पडलेलं सर्व खड्डे येत्या २५ दिवसात बुजवा असे आदेशीत केले आहे. यामुळे आता मनपा तब्बल चार महिन्यांनी जागी झाली असून आता तरी नागरिकांना रत्यावरील खड्ड्यातून मुक्ती मिळेल असे मानायला काही हरकत नाही. NashikOnWeb Impact

Nashik Potholes   नाशिक खड्डे
मनपाचा शहाणपणा माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न

निवडणुका आणि पावसाळा संपून आता काही दिवस गेले आहेत. जवळपास शहरातील नागरिक चार ते पाच महिने झाले शहरातील खड्यांमुळे हैराण झाले आहेत. यावर नागरिकांनी अनेकदा टीका देखील केली. तर विरोधी पक्षांनी अनेक आंदोलने केली. शेवटी मनपा चार महिन्यांनी जागी झाली असून आता शहरातील हजारो खड्डे बुजवणार आहे.

भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या नाशुक मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे ३० नोव्हेंबर पर्यंत बुजवून शहर खड्डेमुक्त करण्याचा सूचना स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी दिल्या आहे.  शहर व परिसरात रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याबाबतच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली होती व सोशल मिडीयावर तर नागरिकांनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री यांना देखील तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत स्थायी समिती सभागृहात बांधकाम विभागाचे प्रभाग निहाय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे.

उद्धव निमसे नाशिक
नाशिक शहरातील सर्वच विभागीय कार्यालयाच्या प्रभागानुसार अधिकाऱ्यांकडून खड्डयांच्या परिस्थिती बाबत आकडेवारी नुसार आढावा घेण्यात आला असून खड्डे त्वरित बुजवण्याचे आदेश सभापती उद्धव निमसे यांनी दिले.

या बैठकीत प्रभाग निहाय असणारे खड्डे, तसेच आतपर्यंत बुजवण्यात आलेले खड्डे यांची सविस्तर माहिती अधिकार्‍यांकडून घेतली गेली. सोबतच रस्त्याच्या बाजूच्या साईट पट्ट्या, रोड डिव्हायडर स्वच्छता करण्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

nashikonweb.com च्या फेसबुक पेजवर मनपाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली होती, त्यास अनेक नागरिकांनी पाठींबा दर्शवला व मनपावर जोरदार टीका करत कारवाईची मागणी केली होती.

येत्या ६ नोव्हेंबर पासून रस्त्यांच्या साईट पट्ट्या भरणे, तणनाशक मारून व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात यावे. तसेच १० नोव्हेंबर नंतर रस्त्यांचे खड्डे तातडीने बुजवून ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करण्यात यावे या कर्तव्यात कसूर झाल्यास त्याची जबाबदारी संबधित अधिकाऱ्यावर राहणार असल्याचे सांगण्यात आले. तर यापुढे पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स डांबर वापरण्याचे नियोजन करणे बाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मनपा आता शहरातील ८६४६ खड्डे बुजवणार आहे.

मात्र हे खड्डे ३० नोव्हेंबर पर्यंत मनपा प्रशासन बुजवेल का हा देखील मोठा प्रश्न उभा झाला आहे. हे खड्डे बुजवताना मनपाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे.

यावेळी बैठकीला नगरसेविका कल्पना पांडे,नगरसेवक चंद्रकांत खोडे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी,रामसिंग गांगुर्डे, सतीश हिरे आदींसह उपअभियंता,शाखा अभियंता उपस्थित होते.NashikOnWeb Impact

मनपाचे प्रसिद्धी पत्रक पुढील प्रमाणे :

नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे ३० नोव्हेंबर पर्यंत बुजवून शहर खड्डेमुक्त करण्याचा सूचना मा. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी दिल्या. शहर व परिसरात रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून त्याबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली असून याची दखल घेत स्थायी समिती सभागृहात बांधकाम विभागाचे प्रभाग निहाय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रभाग निहाय असणारे खड्डे,बुजवण्यात आलेले खड्डे याची सविस्तर माहिती अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूच्या साईट पट्ट्या, रोड डिव्हायडर स्वच्छता करणेचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अधिकाऱ्याने प्रभागनिहाय पाहणी करून पुनश्च एकदा खड्डे निरीक्षण करून ते खड्डे त्वरित बुजविणेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात व त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिनांक ६ नोव्हेंबर पासून रस्त्यांचे साईट पट्ट्या भरणे, तणनाशक मारून व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात यावे.

तसेच दिनांक १० नोव्हेंबर नंतर  रस्त्यांचे खड्डे तातडीने बुजवून ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करण्यात यावे या कर्तव्यात कसूर झाल्यास त्याची जबाबदारी समधीत अधिकाऱ्यावर राहणार असल्याचे सांगितले यापुढे पावसाळ्यात  खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्स डांबर वापरण्याचे नियोजन करणे बाबत सूचना देण्यात आल्या शहर व परिसरातील प्रभागांमध्ये  ज्या भागातील रस्ते दहा ते बारा वर्षांचे झालेले आहेत त्या परिसरातील लोकप्रतिनिधींना भेटून  माहिती घेऊन त्या रस्त्यांचे अस्तरीकरनाचे नवीन प्रस्ताव तयार करून  नवीन अर्थसंकल्पात येतील याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी दिल्या. NashikOnWeb Impact

या या बैठकीस नगरसेविका कल्पना पांडे,नगरसेवक चंद्रकांत खोडे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे,शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी,रामसिंग गांगुर्डे, सतीश हिरे आदींसह उपअभियंता,शाखा अभियंता उपस्थित होते. रस्त्यावरील बुजविणेत येणाऱ्या खड्डे /ओघळयांची एकूण संख्या८६४१

Nashik On Web ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ನವೆಂಬರ್ 4, 2019
आमचे फेसबुक पेज ज्याला नाशिककरांनी जोरदार पाठींबा दिला असून, त्यावर खड्डे बाबत वृत्त प्रसारित केले होते. कृपया लिंक क्लिक करा, आमचे पेज लाईक करा.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.