संधी चुकवू नका नशिककर मनपा आयुक्त यांना विचारार तुमचे प्रश्न हा आहे मार्ग –

महापालिका आयुक्त देणार नाशिककरांच्या प्रश्नांना उत्तरे : –
नाशिक: शनिवार दिनांक १८ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ५:०० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे हे नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे जनमानसामध्ये विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळावी अशी नागरिकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. आयुक्तांकडून अधिकृत उत्तरे मिळणार असल्यामुळे नागरिकांकडून फेसबुक लाईव्ह कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न येत आहेत.


सदर कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी नागरिकांनी खालील लिंकवर क्लिक करून आपले प्रश्न विचारावेत.
लिंक: https://bit.ly/NashikFacebooklive
जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होउन लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 
आताच फेसबुक पेजला लाईक करा म्हणजे लाईव्ह सुरू झाल्यावर तुम्हाला त्याचे अपडेट मिळेल 

https://www.facebook.com/NashikOnWeb
nashikonweb.page link

https://www.facebook.com/mynashikmc/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.