बिटको हॉस्पिटलमध्ये शॉर्टसर्किट जीवित हानी नाही…

नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता छोटा शॉर्टसर्किट झालं.. त्यामुळे अचानक तीन ते चार व्हेंटिलेटर अचानक बंद पडल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे बिटको हॉस्पिटलचे डॉ. धनेश्वर यांनी सांगितले.nashikCorporation BitcoHospital

येथील महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयातील कोविड सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावरील व्हेंटिलेटर कक्षात मंगळवारी ( दि.१८ ) रात्री पावणे आठच्या सुमाराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. अचानक घडलेल्या या प्रकाराने रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

रात्री आठच्या सुमाराला व्हेंटिलेटर कक्षातील बेड नंबर अकराच्या वायरिंग मधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच घबराट पसरली. शॉर्ट सर्किटमुळे बेड नंबर चार, आठ, नऊ आणि दहा येथील वायरिंग देखील नादुरुस्त झाली. त्यामुळे तेथील रुग्णांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. येथील अतिदक्षता विभागात असणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना याविषयी माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता व्हेंटिलेटर कक्षात धाव घेतली. अस्वस्थ वाटत असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला.त्यांनी केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नामुळे रुग्णांचा जीव वाचला.

दरम्यान या घटनेत एका महिलेचा मृत्यु झाल्याची चर्चा सुरु होती. परंतु, याबाबत बिटको प्रशासनाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचा खुलासा केला आहे. या घटनेचे वृत्त समजताच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे , डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर आदींनी तातडीने बिटकोत धाव घेत व्हेंटिलेटर कक्षाची पाहणी केली.

रुग्ण दगवाल्याची अफवा 

मंगळवारी रात्री व्हेंटिलेटर कक्षात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चार रुग्ण दगावल्याची अफवा नाशिकरोड परिसरात पसरली होती. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. सर्वांनी बिटको रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र येथे एकही रुग्ण दगावले नसल्याची  अधिकृत माहिती सूत्रांनी दिली.त्यामुळे रुग्ण दगवाल्याची केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

जवळपास चार व्हेंटिलेटर जळून खाक झाले

नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. रुग्णालयामध्ये संध्याकाळच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने जवळपास चार व्हेंटिलेटर जळून खाक झाले. इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे रुग्णांचा जीव वाचला असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्राने पीएम केअर फंडातून दिले व्हेंटिलेटर

दुसरीकडे सगळीकडेच व्हेंटिलेटर बेडचा प्रचंड तुटवडा आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने आपला जीवही गमवावा लागतोय. त्यातच केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला दिलेल्या 60 व्हेंटिलेटरची दुरवस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या बिटको आणि झाकीर हुसेन या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्राने पीएम केअर फंडातून हे व्हेंटिलेटर दिले. मात्र, केंद्राच्या पातळीवरील सावळ्या गोंधळाने हे व्हेंटिलेटर तब्बल 10 दिवस होऊनही रुग्णांच्या उपयोगासाठी आलेले नाहीत. केंद्र सरकारने नाशिकसाठी व्हेंटिलेटर तर पाठवले, मात्र व्हेंटिलेटर जोडण्यासाठी लागणारे आवश्यक सुटे पार्ट्स (कनेक्टर) सोबत पाठवण्यातच आले नाही. हे सुटे पार्ट मिळालेच नसल्याने पाठवलेले 60 व्हेंटिलेटर्स अक्षरशः धूळ खात पडून आहेत. विशेष म्हणजे शहरात एकीकडे एका एका व्हेंटिलेटरसाठी रुग्ण तडफडत आहेत. असं असताना तब्बल 60 व्हेंटिलेटर फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे पडून असल्याचं बघायला मिळत आहे.nashikCorporation BitcoHospital

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.