वीकेण्ड लाॅकडाउन कायम; अत्यावश्यक सेवा सुरु
नाशिक
जिल्ह्यात विकेण्ड लाॅकडाऊन कायम राहणार असून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी राहणार आहे. विकेण्ड लाॅकडाऊनमध्ये कोणतीही सूट नसून व्यापारी वर्गाने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विकेण्ड लाॅकडाऊनबाबत आज (शुक्रवार, दि.४) शहर व जिल्ह्यातील व्यापारी व दुकानदारांमध्ये संभ्रवस्था पहायला मिळाली. मात्र, शनिवार व रविवार या दिवशी ठरल्याप्रमाणे विकेण्ड लाॅकडाऊन कायम राहणार असल्याचे जिल्हाप्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
१ जूनला जेव्हा जिल्ह्यातील लाॅकडाऊन अंशत: शिथील करण्यात आला तेव्हाच विकेण्ड लाॅकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले होते.
मेडिकलसह जीवनावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील. सोशल मीडियावर विकेण्ड लाॅकडाऊन शिथीलबाबत फिरणार्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून व्यापारी व दुकानदारांना करण्यात आले आहे.
उद्यासाठी (दि. 05) कोणताही संभ्रम राहू नये यासाठी लॉकडाऊन अंशतः शिथिल करताना निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील कृपया मुद्दा क्र. 10 वाचावा. अगोदर ठरल्याप्रमाणे शनिवार व रविवार असा विकएंड लॉकडाऊन कायम असून व्यापारी व दुकानदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
– सुरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक
Nashik Weekend Lockdown Update
या सेवा राहणार सुरु
– वैद्यकिय सेवा
– मेडिकल दुकाने
– दूध,भाजीपाला, वृत्तपत्र विक्री
– हाॅटेल, रेस्टारंटमधून होम डिलिवरी सेवा
– शिवभोजन थाळी सकाळी १० ते दुपारी २
Nashik Weekend Lockdown Update