नाशकात आता दर बुधवारी ड्राय डे

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने नाशिक शहरात पाणीकपातीची वेळ आली आहे. गंगापूर धरण परिसरात येत्या ६ दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास दर बुधवारी एक दिवसाची पाणीकपात करून ड्राय डे पाळण्यात येणार असल्याचे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. Nashik Water Crisis Dry Day

गंगापूर धरणात आता केवळ २५% पाणीसाठा असून हे पाणी शहराला केवळ ४० दिवस पुरेल. गतवर्षी आजच्या दिवशी हेच प्रमाण ३५% एवढे होते.  मुकणे धरणही केवळ २४% पाणीसाठा आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाणीकपातीबाबत महापालिकेने निर्णय घ्यावा असे सांगितल्यानंतर महापौरांनी आढावा घेत वरील सूचना पारित केली आहे.

नाशिक जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीपेक्षा केवळ १७% पाऊस पडला. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांत मिळून केवळ २७% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. जुलै महिन्यातही पावसाने निराशा केल्याने जिल्ह्यातील ६५ टीएमसी क्षमतेपैकी केवळ १७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाच धरणांची जलपातळी १०% पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात वाट बघून पुढील आठवड्यापासून हा निर्णय अमलात आणण्यात येईल.

२०१८ नंतर प्रथमच नाशकता पाणीकपातीचे संकट ओढवले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे महापौरांनी विनंती केली आहे. जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. Nashik Water Crisis Dry Day

धरणनिहाय पाणीसाठा (टक्केवारित)

गंगापूर – ३५, कश्यपी -१७, गौतमी गोदावरी – १२, आळंदी – ७, पालखेड – ३०, करंजवण- ७, वाघाड – ३, अोझरखेड – २६, पुणेगाव -७, तिसगाव – १, दारणा – ४६, भावली -४४, मुकणे – २४, वालदेवी- ६७, कडवा – १४, नांदूरमध्यमेश्वर – ९५, भोजापूर – १३, चणकापूर – १३, हरणबारी – ३५, केळझर – १२, नागासाक्या – ०, गिरणा – ३३, पुनद -१४, माणिकपुंज – ०

 

फेसबुक वर आम्हाला फॉलो करा…

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.