ylliX - Online Advertising Network

Nashik Summer Onion Rates उन्हाळ कांदा @5600! लासलगावी भाव वधारले

लासलगाव – निफाड / पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यात उपलब्ध असलेला उन्हाळ कांदा सरकारने आणलेल्या विविध निर्बंधांनंतरही अजूनही भाव खात असल्याचे दिसते. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विचार बाजार समितीत शनिवारी (दि. २ नोव्हेंबर) उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल जास्तीतजास्त ५६०० इतका मोसमातील विक्रमी भाव मिळाला. केवळ ४००क्विंटल कांद्याची आवक यावेळी झालेली दिसून आली. कमीतकमी भाव ३००० तर सरासरी ५३०० एवढा भाव मिळाला. तर लासलगाव मुख्य बाजारसमितीत २०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन सरासरी ४९०१ रुपये असा भाव मिळाला. Nashik Summer Onion Rates

गेल्या तीन दिवसात जवळपास १५०० ते २००० रुपयांनी उन्हाळ कांदा वधारला असून केंद्र सरकारने एक महिन्यापूर्वी निर्यातबंदी आणल्यानंतर उन्हाळ कांडा गडगडला होता. मात्र बंगळुरूच्या गुलाबी कांद्याला निर्यातीस परवानगी दिल्यानंतर उन्हाळ कांद्यासह काही प्रमाणात लाल आणि लोकल कांदाही चांगला भाव घेत असल्याचे दिसत आहे.

लासलगावचीच उपसमिती असलेल्या निफाड येथे शुक्रवारी १ नोव्हेबर रोजी उन्हाळ कांद्याला कमाल रुपये ५१०० एवढा भाव मिळाला आहे. येथे केवळ ४७३ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन कमाल भाव ५१०० तर कमीतकमी भाव २९०० तर सरासरी रुपये ४७०० एवढा राहिला.

केवळ चार ते पाच दिवसाच्या कालावधीत भाव १५०० ते २००० रुपयांनी वधारला असला तरी त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना किती होत आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. ज्यांच्या कडे चांगली आणि सुरक्षित साठवण क्षमता असलेल्या चाली आहेत आणि योग्य निर्णय घेत आजपर्यंत कांदा पुरवला आहे त्यांना फायदा होत आहे.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला कमाल ४९३५ रुपये भाव मिळाला, कमीतकमी २२५१ तर सरासरी ४५५१ रुपये भाव राहिला. जिल्ह्यात फारच कमी कांदा शिल्लक असून आज पिंपळगाव येथे केवळ २००० क्विंटल कांद्याची आवक झाली. तर लासलगावी १६०० क्विंटल कांद्याची आवक झाली.

दिवाळीच्या काळात झालेला आणि आताही जोरदार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे नवा कांदा बाजारात येण्यास अवकाश होत आहे. तसेच तो आलेला कांदा काय प्रतीचा असेल याचीही शाश्वती उरलेली नाही. तसेच परराज्यातूनही कांद्याची मागणी वाढली आहे. कर्नाटकातील बंगळुरूच्या गुलाबी कांद्याला निर्यातीची तात्पुरती परवानगी दिली असली तरी नाशिकच्या शेतकऱ्यांना कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.

असे असले तरी जिल्ह्यातील उन्हाळ कांडा अती मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे चांगल्या पद्धतीने साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत आहे.

लासलगावी याहून वेगळी स्थिती नसून १६०० क्विंटल कांद्याची आवक होऊन कमीतकमी २१००, जास्तीतजास्त ४७०० तर सरासरी ४३५१ एवढा भाव राहिला. तर निफाड येथे ४७३ क्विंटल आवक होऊन कमाल भाव ५१०० तर कमीतकमी भाव २९०० तर सरासरी ४७०० राहिला.

आजचा कांदा बाजार भाव – 2 November 2019

आजचा कांदा बाजार भाव – 1 November 2019

रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजारभावNashikOnWeb.com – रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव मिळविण्यासाठी जॉईन करा.https://t.me/bajarbhav

Nashik Summer Onion Rates

Share this with your friends and family

You May Also Like

2 thoughts on “Nashik Summer Onion Rates उन्हाळ कांदा @5600! लासलगावी भाव वधारले

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.