नाशिक येथून आयोध्येकडे हजारो शिवसैनिक जाणार उद्धव यांच्या मेळाव्याला

नाशिक : राम मंदिराचा मुद्या पुन्हा तापवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २५ रोजी आयोध्देला जाणार आहेत. तपोवन अर्थात राम निवास केलेलं नाशिक जिल्ह्यातून देखील हजारो शिवसैनिक आयोध्देला हजेरी लावणार आहे. पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीच मोठ्या संख्येने आयोद्धेला जाण्याचा निर्धार  केला आहे.nashik shivsena uddav thakrey aayodhya thousand shivsainik nashik news now

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित बैठकीत शिवसेना महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नियोजन कसे असणार याची चर्चा केली. बडवे यांनी सांगितले की, येत्या २५ रोजी शिवसेना पक्षप्रमुख आयोद्धेला जाणार असून, त्यांच्यासोबत हजारो शिवसैनिक देखील जाणार आहेत, त्यामुळे राम जेथे वनवासात होते त्या नाशिक जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून यासाठी एका विशेष गाडीचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे.nashik shivsena uddav thakrey aayodhya thousand shivsainik nashik news now

मराठे म्हणाले की, गुरूवार दि. २२ २ोजी रात्री ११.३० वाजता ही गाडी नाशिक येथून निघेल ३० तासांच्या प्रवासानंतर शनिवारी दि. २४ रोजी सकाळी ८ वाजता गाडी फैजाबाद उत्तरप्रदेश येथे पोहचेल. रविवारी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील त्यानंतर रविवारी रात्री आयोद्धेहून निघून मंगळवारी नाशिकरोडला येण्याचे नियोजन असल्याचे मराठे यांनी सांगितले. दरम्यान, निफाड, नांदगाव, मनमाड, येवला, नाशिकरोड, देवळाली येथील शिवसैनिक हे खासगी वाहनाने आयोद्धेला पोहचणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

nashik shivsena uddav thakrey aayodhya thousand shivsainik nashik news now

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.