विद्यमान महानगरप्रमुख महेश बडवे व सचिन मराठे यांची उचलबांगडी करण्यात आली. बडवे यांच्याकडे पंचवटी, नाशिक पश्चिम व सिडको या विभागांची जबाबदारी होती. तर सचिन मराठे यांच्याकडे नाशिक रोड पूर्व विभाग व सातपूर विभागाची जबाबदारी होते. दोन वर्षांपूर्वी नियुक्ती झाल्यानंतर दोघांकडूनही अपेक्षित असे काम झाले नाही. Nashik Shivsena mahanagar pramukh

दोन दिवसापूर्वी संपर्क नेते खासदार राऊत नाशिकमध्ये आले होते मात्र संघटनेत कुठलेही फेरबदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले . मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल व्हावेत असे कार्यकर्ते मागणी करत होते, त्यामुळे राऊत हे मुंबईत जाताच त्या जागी ज्येष्ठ नगरसेवक बडगुजर यांची नियुक्ती आज जाहीर केली आहे. बडगुजर यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकीची देखील जबाबदारी राहणार आहे.
नाशिकचा पुढचा महापौरही शिवसेनेचाच ?
नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा खोचक टोला लगावतानाच जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं राऊत म्हणाले होते.
नाशिकमध्येही महाविकास आघाडीचा विचार केला तर शिवसेना पहिल्या नंबरवर आहे. मात्र सर्वांचा सन्मान राखूनच निवडणुका लढवल्या जाणार आहेत. कोणी कोणा बरोबर गेलं तरी मुंबई मनपा शिवसेनेकडेच राहील आणि नाशिकचा पुढचा महापौरही शिवसेनेचाच होईल, असं राऊत म्हणाले. Nashik Shivsena Mahanagar Pramukh