नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांच्या पतसंस्थेला सन २०१७-१८ या वर्षाकरिता ५१ लाख ८८ हजार रुपयांचा विक्रमी नफा झाला आहे. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता खेळीमेळीच्या वातावरणात मोहिनीदेवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिरच्या सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक बाकळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य जयंतराव मोंढे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते. Nashik Shikshan Prasarak Mandal Sevak Patsanstha Record Profits Rs52 lakhs
सातत्याने पतसंस्थेला ‘अ’ वर्ग लेखा परीक्षण प्रमाणपत्र मिळत आहे. ४७८ सभासद असलेल्या या संस्थेचे भाग भांडवल ६ कोटी रुपये आहे. या वर्षी ५१ लाख ८८ हजार रुपयांचा विक्रमी नफा झाला असून ९ टक्क्याने सभासदांना लाभांश देण्याचे या सभेत निश्चित करण्यात आले आहे. संस्थेमार्फत सभासदांना ५ लाखापर्यंत दीर्घ मुदतीचे कर्ज व २० हजार रुपयांचे आकस्मित कर्ज ९ टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. Nashik Shikshan Prasarak Mandal Sevak Patsanstha Record Profits Rs52 lakhs
संस्थेचे मानद सचिव अश्विनीकुमार येवला यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून दाखविले व अहवाल सादर केला. त्यानंतर संस्थेच्या मागील वर्षाच्या आर्थिक विवरण पत्रावर चर्चा करण्यात आली. अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून प्रकाश गरुड यांची तर तक्रार निवारण समितीत प्रदीप रहाटे, श्रीमती शांता तुसे, संजय नाईक, प्रा. योगेश पाटील सन २०१८-१९ या वर्षासाठी निवड करण्यात आली. सभेच्या वतीने त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्याबद्दल मानद सचिव यांनी सभासदांचे आभार मानले. Nashik Shikshan Prasarak Mandal Sevak Patsanstha Record Profits Rs52 lakhs
सभेच्या सुरुवातीला निवृत्त झालेल्या सभासदांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. निवृत्त सभासदांच्या वतीने दीपक पर्वतीकर, संजीव ढवळे, योगिनी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सभा यशस्वीतेसाठी पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य सुरेश दीक्षित, समीर कुलकर्णी, संजय वाघ, दत्तात्रय महाजन, श्रीमती मनीषा ढाके, मीनल बर्वे, सोनाली, मोहिनी भगरे, आरती कुलकर्णी, मधुकर शिंदे, शंकर चौधरी, शेखर ढेपे यांनी प्रयत्न केले.