सटाणा पोलीस स्टेशन पोलिसांच्या वतीने जाहीर आवाहन
साक्री : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू
सटाणा प्रतिनिधी – सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, मागील काही दिवसापासून काही समाजकंटक व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे,नंदुरबार,जळगांव,नाशिक जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकात भीती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे. nashik satana police public appeal children kidnapping rumors sakri killing
त्यामुळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पोलिसांकडून सटाणा तालुक्यातील जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. nashik satana police public appeal children kidnapping rumors sakri killing
सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सटाणा पोलीस स्टेशन 02555-223033
साक्री : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून मारहाण; पाच जणांचा मृत्यू