Jitendra Bhave भावे यांच्यावर या हॉस्पिटल कडून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक: सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र भावे यांच्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक मधील कॉलेज रोड परिसरात स्थित व्हिजन हॉस्पिटल मध्ये रुग्णांचे राहिलेले ( थकीत ) बिल न अदा करता निघून गेले म्हणून भावेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Sarkarwada Police station booked case against Jitendra Bhave on complaint of Vision Hospital)Jitendra Bhave

शहरातील कॉलेजरोडवरील विजन रुग्णालयात एका रुग्णावर करण्यात आलेल्या उपचारखर्चाची मुळ कागदपत्रांची मागणी करण्यासाठी ‘ऑपरेशन हॉस्पिटल’चळवळीचे जितेंद्र भावे हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह शनिवारी (दि.२२) पोहचले. त्यांनी मयत कोविड रुग्णाच्या उपचारखर्चाांची मुळ बिले व अन्य कागदपत्रांची मागणी केली. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रार सरकारवाडा पोलिसांकडे डॉक्टरांनी केली आहे. यावरुन पोलिसांनी संशयित जितेंद्र भावे यांच्यासह मयत रुग्णाचे नातेवाईकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि.२६) भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकासोबत मिळून अर्धनग्न आंदोलन केले होते. हे आंदोलन सोशलमिडियावरुन थेट प्रसारित करण्यात आल्याने ते चांगलेच चर्चेत आले. दरम्यान, गेल्या शनिवारी भावे हे विजन रुग्णालयात अवाजवी बिल आकारल्याची तक्रार घेऊन गेले होते.

जितेंद्र भावेंवर कोणत्या कारणांमुळे गुन्हा दाखल
कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनासोबत धमकून नित्य कामात अडथळा म्हणून वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय भावेंवर साथरोग सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुंबई नाका पोलिसांतही गुन्हा दाखल
बुधवारी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्थानकात जितेंद्र भावे व त्यांच्या समर्थकांवर गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवसापूर्वीच नाशिकच्या नामांकित वोकार्ड हॉस्पिटलमध्ये जितेंद्र भावे यांनी कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले होते. यानंतर जितेंद्र भावे चर्चेत आले होते. नाशिकच्या एका नामांकित हॉस्पिटलने कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिल आकारल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांनी करत अर्धनग्न आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होते. रुग्णालयातील आंदोलन प्रकरणी जितेंद्र भावे आणि समर्थकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्या प्रकरणी जितेंद्र भावे आणि समर्थकांव र गुन्हा दाखल करण्यात आला होता. जितेंद्र भावे यांच्यावर कलम 188 आणि बेकायदेशीर रित्या गर्दी जमवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र भावे यांनी मंगळवारी नाशिकमधील नामांकित रुग्णालयात हॉस्पिटलच्या बिलाच्या मुद्यावरुन आंदोलन केलं होतं.

नाशिक शहरातील वेगवेगळ्या रुग्णालय मध्ये जाऊन अवाजवी बिलाविरुद्ध भावे सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करून जितेंद्र भावे रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत असतात. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे आम आदमी पक्षाशी संबंधित आहेत. विजन हॉस्पिटलचे डॉक्टर विक्रांत विनोद व्हिजन यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.Jitendra Bhave

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.