ylliX - Online Advertising Network

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनांना अत्याधुनिक जीपीएस प्रणालीची जोड; फिरते पोलीस ठाणे

नाशिक : जिल्हा नियोजन  व विकास समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जी.पी.एस प्रणालीने सुसज्ज गस्ती पथकाचे वाहन व फिरते पोलीस  ठाणे उपक्रमाचा शुभारंभ ओझर विमानतळ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. nashik rural police vans gps system mobile police station

कार्यक्रमाला यावेळी पालकमंत्री  गिरीष महाजन,  खासदार  हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी,  आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, जि.प. अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक चेरींग दोरजे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते. nashik rural police vans gps system mobile police station

Nashik News On Web Latest Update City Marathi Batmya, nashik rural police vans gps system mobile police station, devendra fadnavis visit नाशिक

नागरिकांच्या विविध तक्रारीसंदर्भात सुरक्षिततेची हमी वाढविण्यासाठी कार्यक्षम पोलीसिंग करणे व जवळ असलेल्या पोलीस वाहनास नागरिकाच्या मदतीत त्वरीत पाठविण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. एकूण 92 वाहनांवर जीपीएस आधारीत प्रणाली बसविण्यात आली आहे. ही अत्याधुनिक प्रणाली अपघाताच्या वेळेस आणि गंभीर गुन्ह्याच्यावेळी जलदगतीने व अचुकतेने मदत पाठविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जीपीएस प्रणालीसोबत फिरते पोलीस ठाणे ही महत्वपूर्ण योजना ग्रामीण पोलीस दलातर्फे कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 40 पोलीस ठाणे अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिला अत्याचार, बँक व सोशल मिडियाद्वारे फसवणुकीचे प्रकार, चेन स्नॅचिंग आदी प्रकार टाळण्यासाठी फिरते पोलीस ठाणे उपयुक्त ठरणार आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करा… https://www.facebook.com/NashikOnWeb/

nashik rural police vans gps system mobile police station
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.