भंगार गोळा करणाऱ्याचा रस्त्यावर दगडाने ठेचून खून

नाशिक : नाशिक शहरालगत असलेल्या नाशिकरोड येथील वास्को चौकात पहाटे तीन ते साडेचार वाजेच्या सुमारास एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (४१) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.

भंगार गोळा करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अद्याप खुनाचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाळू दोंदे यांचा भाऊ धनवंत दोंदे यांची चहाची हातगाडी आहे. गुरुवारी सकाळी सातवाजेच्या सुमारास एका मोबाईल नंबर करून त्याला फोन आला. यात फोन करणाऱ्याने बाळासाहेब दोंदे याला वास्को चौकात कोणी तरी दगडाने मारले आहे. तो तिथे पडलेला असून रक्त निघत असल्याचे सांगितले.

त्यानंतर धनवंत दोंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे उभा असलेला संतोष कटारे यांनी मला बाळू दोंदे यांनी सांगितले की, भंडारी प्लाउड दुकाना समोर जाऊ नको तिथे तीन व्यक्ती असून त्यांनीच मला दगडाने मारहाण केली असे सांगितले. तर बाळू दोंदे मृत अवस्थेत पडलेला होता.

दरम्यान मयत बाळासाहेब दोंदे यांचे मोठे भाऊ अनिल आणि धनवंतर दोंदे यांचा महावीर बॅगच्या दुकानजवळ चहाचा हातगाडा आहे. दोघेही चेहडी परिसरात वास्तव्यास आहे. अनिल दोंदे यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी संशयित गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.