ylliX - Online Advertising Network

नाशिककरांनी अनेक गुन्हेगार, दलबदलू उमेदवारांना बसविले घरी

प्रथमच एका पक्षाच्या हाती नाशिककरांनी सत्ता सोपवली आहे.  या निवडणुकीत अनेक दिग्गज पराभव सहन करावा लागला असून सर्वाधिक नुकसान हे शिवसेनेचे झाले आहे. तर पक्षांतर करणाऱ्यांना नाशिककरांनी नाकारले आहे. मनसेचे प्रथम महापौरपद भूषविणाऱ्या अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मनसे सोडून सेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून निवडणूक लढवली असली तरी त्यांना मतदारांनी पराभूत केले आहे.
शिवसेनेच्या पहिल्या महिला महापौर नयना घोलप यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यांना भाजपच्या सरोज अहिरे यांनी पराभूत केले, तर त्यांच्या भगिनी तनुजा घोलप यांना भाजपच्याच कोमल मेहरोलिया यांनी पराभूत केले. शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबन घोलप यांच्या या दोन्ही कन्या असून, आमदार योगेश घोलप यांच्या त्या भगिनी आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गाजलेल्या नाशिकरोड येथील पवन पवार यांना भाजपच्या अधिकृत उमेदवाराने त्यांचा पराभव केला आहे.
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश लोंढे यांना प्रभाग नऊमधून नाकारत मतदारांनी भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्याला विजयी केले आहे. माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम पाटीलही पराभूत झाला आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनाही नाशिककरांनी घरी बसविले आहे. जवळपास ७९ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात होते.त्यापैकी निवडणुकीत एकूण ४२ नगरसेवकांचा पराभव झाला आहे.त्यामुळे नेहमी मतदार राजाला गृहीत धरणारे आणि काहीही केले तरी निवडून येवू असा समज झालेल्या अनेकांना घरचा रस्ता दाखवीला आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.