ylliX - Online Advertising Network

nashik rain update नाशिकला ऑरेंज अलर्ट दिला असून धरणातून विसर्ग सुरू

हवामान खात्याने नाशिकला ऑरेंज अलर्ट दिला असून त्यामुळे दोन दिवसांपासून पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 95 टक्के भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाने धरणातून विसर्ग सुरू केला आहे. गोदावरी नदीला पाणी वाढू लागल्याने महापालिकेने गोदकाठी राहणाऱ्या नागरिकांना  सतर्कतेचा इशारा दिला आहे.nashik rain update

दरम्यान, आज सकाळपासून वेगवेगळ्या धरणातूनही विसर्ग सुरू असून यात दारणा धरणातून 10 हजार 562, नांदूरमध्यमेश्वरमधून 36 हजार 631 तसेच पालखेड मधून 5 हजार 964 तर कडवा मधून 5 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

nashik rain update

सकाळपासून गंगापुर धरणात पाणलोटक्षेत्रातून पुर पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणातून ५,११७ क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दुपारी चार वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीवरील शहरातील अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे रामकुंडात ६ हजार २९८ क्युसेक इतका पाण्याचा प्रवाह मोजण्यात आला. इगतपुरी तालुक्यातदेखील मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे दारणा धरणातून ४ हजार ३१६ क्युसेकचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कडवा धरणातूनदेखील २हजार ४९९ क्युसेकचा विसर्ग नदीत सोडला जात आहे.

नाशिक शहरातदेखील पावसाच्या हलक्या व मध्यम सरींचा दिवसभर वर्षाव सुरु राहिला. काही वेळ विश्रांती घेत पावसाच्या सरींचे आगमन होतच राहिल्याने रस्ते ओलेचिंब झाले. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचलेले पहावयास मिळाले. यामुळे दिवसभर नाशिककरांना रेनकोट, छत्रीचा आधार घ्यावा लागला. रात्री अकरा वाजेनंतर शहरात सोसाटयाचा वारा सुटला व मध्यम सरींचा वर्षाव झाला. पहाटेही पावसाने चांगली हजेरी लावली. यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ७.८मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.nashik rain update

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.