कौटुंबिक वादातून घडली घटना , सर्विस रिवॉल्वरचा वापर
नाशिक : पेठरोड परिसरातील असलेल्या अश्वमेघनगर येथील रहिवासी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने झालेल्या कौटुंबिक वादातून दोघा सावत्र मुलांवर सर्विस रिवॉल्वर मधून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेत दोघाही तरुण मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्विस रिवॉल्वरमधून त्यांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेने परिसरात व पोलिस दलात खळबळ उडाली आहे. Nashik Police Service Man Killed Step Children City News
सविस्तर वृत्त असे की, उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी संजय अंबादास भोये यांचे त्यांच्या सावत्र मुलांसोबत जोरदार भांडण झाले होते. मात्र नेहमी होणारे हे भांडण यावेळी विकोपाला गेले, त्यामुळे संतापलेल्या भोये यांनी गोळीबार केला, यावेळी दोन्ही मुले वाचण्यासाठी लपून बसली मात्र गोलीबारीत दोन्ही मुलाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत सोनू नंदकिशोर चिखलकर (वय 25) व शुभम चिखलकर (वय 22) वर्षीय या दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस कर्मचारी संजय अंबादास भोये याने त्यांच्या सर्विस रिवॉल्वरमधून तीन गोळ्या झाडल्या आहेत. पंचवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
भोये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी भोये याच्याकडून गोळीबार केलेले पिस्तूल जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस भोये यांच्या कुटुंबाची चौकशी सखोल चौकशी करत असून, कौटुंबिक वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत सोनू चिखलकर हा नौदलात कार्यरत होता. तर शुभम नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे समजते.
One thought on “पोलिस कर्मचाऱ्याचा सावत्र मुलांवर गोळीबार; दोघे ठार”