पोलिस भरती संमिश्र प्रतिसाद उत्तम नियोजन

शहर व ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाईपदांच्या भरतीप्रक्रियेस बुधवारपासून (दि़ २२) सुरुवात झाली़ आहे. तर ही भरती प्रक्रिया निर्विघ्न पूर्ण व्हावी या करिता नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला आहे. तर उमेदवार गर्दी होवू नये या करिता रोज फक्त एक हजार उमेदवार परीक्षा देत आहेत. तर आज २३ मार्च रोजी शर ठिकाणी एकूण  ९५० पात्र उमेदवार बोलावले होते. त्यापैकी ६५५ उमेदवार उपस्थित राहिले आहेत. तर २९५ उमेदवार गैरहजर होते. तर ३७ उमेदवार अपात्र होते तर ४ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

शहर पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाच्या रिक्त ७९ व बॅण्ड पथकातील १८ अशा एकूण ९७ तर ग्रामीण पोलीस दलातील रिक्त ७२ जागांसाठी ही भरतीप्रक्रिया होते आहे़  शहर व ग्रामीणमध्ये पहिल्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या २ हजार १६९ उमेदवारांना बोलविण्यात आले होते़ त्यापैकी ६४५ उमेदवारांनी दांडी मारली तर १ हजार ३६१ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत़

शहर पोलीस भरती ही पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तर ग्रामीण पोलीस भरतीप्रक्रिया ही आडगावच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु आहे. शिपाईपदाच्या रिक्त ७९ व बॅण्ड पथकातील १८ अशा एकूण ९७ जागांसाठी १४ हजार २२० तर नाशिक ग्रामीण पोलीस शिपाईपदाच्या रिक्त ७२ जागांसाठी ११ हजार २९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.  पहिल्या दिवशी ९६९ उमेदवारांना बोलविण्यात आले होते़ त्यापैकी ६९७ उमेदवार हजर झाले तर २७२ उमेदवारांनी दांडी मारली़ हजर उमेदवारांमध्ये ६४३ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले तर ५४ उमेदवार अपात्र ठरले़. तर ग्रामीण भरती ठिकाणी   आडगाव  मैदानावर पहिल्या दिवशी १ हजार २०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते़ त्यापैकी ८२७ उमेदवार हजर झाले तर ३७३ उमेदवारांनी दांडी मारली़ हजर उमेदवारांपैकी १०२ उमेदवार अपात्र ठरले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.