ylliX - Online Advertising Network

महिलेच्या मृत्युस कारणीभूत : आंध्रातील आंतरराज्यीय पेटला टोळी पकडली

पाळत ठेवून चोरी करत होते nashik police arrested Andhra gang killed woman nashik nandini river bridge 

नाशिक : बँकेतून रोख रक्कम काढल्यानंतर मुलीसमवेत दुचाकीवरून घरी जात असताना महिलेचा पाठलाग करत, चालत्या गाडीवरून महिलेच्या हातातील बॅग खेचताना दुचाकीवरून महिला डोक्यावर  खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.  या प्रकरणात  शिला गायकवाड यांना आपला जीव गमवावा लागला होता. या मृत्यूस कारणीभूत ठरलेली आंध्र प्रदेशातील कुख्यात ‘पेटला’नावाची  आंतरराज्यीय टोळीतील तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने नांदेडहून अटक केली आहे. पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी सोमवारी (दि़९)माहिती दिली आहे. या टोळीतील राजू प्रकाशम् पेटला (५८), शिवाजी राजू पेटला (२२), याकुब पावलू गुड्डेटी (३८, सर्व रा़ कपराल तिप्पा, रा़ कावेल्ली, जि़ नेल्लूर, आंध्र प्रदेश) यांना अटक केली आहे.nashik police arrested Andhra gang killed woman nashik nandini river bridge 

पार्कसाईड रेसिडेन्सीतील शिला गायकवाड (फ्लॅट नंबर १२०१) या मुलगी तक्षशिलासोबत १४ मार्च २०१८ रोजी नाशिक-पुणे रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियात पैसे काढून दोन लाख ७० हजार रुपये बॅगेत ठेवून घरी परत येत होत्या.तेव्हा त्यांच्या मागावर असलेल्या असलेल्या पल्सर दुचाकीवरील दोन संशयितांनी नासर्डी पुलाजवळ शिला गायकवाड यांच्या हातातील  पैशांची बॅग चालत्या गाडीवरून हिसकावली होती, मात्र यावेळी त्यांना मोठा झटका बसला आणि त्या खाली पडल्या होत्या. यानंतर मुलगी तक्षशिलाने मोठ्या धाडसाने संशयितांकडून बॅग परत मिळविली होत. उपचारासाठी शिला यांना  दाखल केले असता सात दिवसांनंतर २० मार्चला शिला गायकवाड यांचे निधन झाले़.

मुंबई नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़.  युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांना या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले,  पोलिसांना हे कृत्य इतर राज्यातील गुन्हेगारांनी केल्याचे शंका आली होती. तेव्हा त्यांनी गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणच्या टोळ्या या प्रकारचे गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली़ तांत्रिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी विश्लेषण केल्यानंतर मिळाली, तर  आंध्र प्रदेशातील पेटला टोळीने हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली. निरीक्षक वाघ व युनिटने संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता ते नांदेड, परभणी व हिंगोली परिसरात असल्याची माहिती मिळाली़.

सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार वसंत पांडव, पोलीस शिपाई विशाल देवरे, विशाल काठे, दीपक जठार, स्वप्निल जुंद्रे हे पथक संबंधित ठिकाणी रवाना झाले़ या तीनही जिल्ह्यांमध्ये तीन दिवस शोध घेतल्यानंतर नांदेड शहरातील मालेगाव रोडवरील भावसार चौकातून राजू पेटला, शिवाजी पेटला व याकूब गुड्डेटी या तिघांना ताब्यात घेतले आहे. आजपर्यंत या टोळीने नाशिक, नांदेड, अहमदनगर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात चो-या केल्या आहेत.  या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, नागेश मोहिते, सचिन खैरनार, जाकिर शेख, गणेश वडजे यांचा या सहभाग होता़. पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते उपस्थित होते़.

आपला Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेवा करा नाशिकच्या बातम्या मिळावा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.