प्लॅस्टिकबंदी : नाशिकमध्ये साडेतीन लाखांची दंडात्मक कारवाई

नाशिक : राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर नाशिकमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीला महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. यात पहिल्याच दिवशी एकुण ७२  वापरकर्त्याविरुद्ध कारवाई करत एकुण ३,६०,००० रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर  एकुण अंदाजे ३५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. यात पूर्व विभागात १४ वापरकर्त्याविरुद्ध रु ७०,००० पश्चिम विभागात १५ वापरकर्त्याविरुद्ध रु रु.७५,०००,नाशिकरोड विभागात १२  वापरकर्त्याविरुद्ध रु.६०,०००, पंचवटी विभागात १५  वापर कर्त्याविरुद्ध रु८०.०००, सातपुर विभागात ५  वापर कर्त्याविरुद्ध रु २५,०००नवीन नाशिक विभागात १०  वापर कर्त्याविरुद्ध रु५०,०००  अशी कारवाई करण्यात आली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.