शहरात बसविणार सीसिटीव्ही

गुन्हेगारी  सोबतच येत असलेल्या  महापालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमावर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याविषयी महापालिका आणि पोलिसांमध्ये एकमत झाले  आहे. यामध्ये महापालिका २६५ ठिकाणी ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचा निर्णय महापौर आणि पोलीस आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला असून ऐकूण ६९६ कॅमेरे बसविले जाणार आहेत.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी २६५ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून त्याठिकाणी ६९६ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून  अंदाजपत्रकात याची  तरतूद करण्याचे आश्‍वासन  महापालिकेकडून देण्यात आले आहे.
बैठक पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस उपआयुक्तांसह महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, आदी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.