घरफोडीतील १९ लाख रुपयांचे ६५२ ग्रॅम सोने हस्तगत, २ अल्पवयीन बालकांचा समावेश
प्रतिनिध : आई बाबा खाऊ साठी पैसे देत नाहीत म्हणून दोन अल्पवयीन मुले चक्क घरफोडी करत सोने लुटत होते. पोलिसांनी या दोघांना आणि इतर साथीदारांना पकडले असून ६५२ ग्रॅम सोने, व गुन्हात वापरलेले वाहन असे २४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. या चोरांचे वय पाहून पोलीस सुद्धा चक्रावले आहे.nashik news four thieves arrested two 10 yeras children
अंबड येथे झालेल्या घरफोडी संदर्भात पोलीसांचा तपास सुरू करत होते. गुन्हे शोध पथकाला या संदर्भात विधी संघर्षित बालकांचा या मध्ये सहभाग असल्याची माहिती मिळाली. दत्त मंदिर परिसरातील शाळेत जाणाºया मध्यवर्गीय कुटूंबातील १० वर्षीय दोन बालकांना ताब्यात घेण्यात आले. खाऊसाठी आई वडिल पैसे देत नाही म्हणून आम्ही चोरी करतो असे उत्तर विधीसंघर्षित बालकांनी दिले होते. पोलिसांनी तपास सुरु ठेवत तुम्ही चोरी कशी करता, चोरीत चोरलेले पैसे किंवा दागिने, सामान कुठे ठेवला अशी विचारणा पोलीसांनी केली असता एका मोठ्या मुलाच्या मदतीने कटावणी ने खिडकीचे गज कापत घरात प्रवेश करत दागिने लंपास करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
या घरफोडीत चोरलेले ४० ग्रॅम सोन्याचे दागिने व नऊ विविध कंपन्यांचे भ्रमध्वनी जप्त करण्यात आले. मात्र हा प्रकार कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी एका डब्यात दागिने ठेवत तो डबा जमिनीत दोघा अल्पवयीन मुलांनी पुरला होता.पोलीसांना बालकांनी डबा काढुन दिला. तर यातील सामील असलेला दुसरा मुलगा विषयी त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता दत्त चौक परिसरातील एक मुलगा खिडकीचे गज कापुन घर फोडतो असे त्यांनी सांगितले.मात्र त्यांचे फक्त वर्णन विधी संघर्षित बालकांनी सांगितले. इतर कोणतीही माहिती त्यांना नव्हती. ही मिळाली माहितीच्या आधारे तीन दिवस पोलीसांनी दत्त चौक परिसरात सापळा रचला होता.या परिसरात एक मुलगा रात्री बेरात्री घरी येतो पण तो काहीच कामधंदा काही करत नाही असे समोर आले. तर त्याच्याकडे भ्रमणध्वनी नाही, नव माध्यमे किंवा वाहन असा कुठल्याही साधनांचा तो वापर करत नसल्याने त्याचा माग काढणे पोलीसांसमोर मोठे आवाहन होते.
पोलीसांनी व्ही. एन. नाईक शाळेजवळील त्याच्या रहात्या घराजवळ सापला रचला असता २४ तासाच्या प्रयत्नानंतर तो गुन्हे शोध पथकाच्या हाती लागला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने विकास झाडे (१९, रा. दत्त चौक) असे आपले नाव सांगितले. संशयित साथीदार आकाश वानखेडे (रा. इंदिरानगर) याच्या मदतीने त्याच्या जवळील सफारी वाहनातून घरफोड्या करत असल्याची माहिती दिली. दिवसभर वाहन अंबड, अश्विान नगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक, सहावी स्कीम, पाटील नगर या ठिकाणी फिरवून टेहळणी करत रात्रीच्या वेळी घरफोडी करायची अशी कबुली विकास ने दिली. पोलीसांनी संशयित विकासला अटक केल्यानंतर आकाश फरार होता. पोलीसांनी त्याचा तपास करत त्र्यंबकेश्वार येथे वाहनासह त्याला ताब्यात घेतले. गाडीची पाहणी केली असता घरफोडी करता लागणारे कटावणी सह टोकदार साहित्य मिळाले.
दोन्ही संशयितांकडून पोलीसांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीत डिसेंबर ते आज पर्यंत झालेल्या १३ घरफोड्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून १९ लाख रुपये किंमतीचे ६५२ ग्रॅम व टाटा सफारी असा एकुण २४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.
nashik news four thieves arrested two 10 yeras children