नाशिकच्या स्थायी समिती सभापतीपदी पहिल्यांदाच महिला येणार Nashik Municipal corporation standing committee himgouri Aakade Next Sabhapati
नाशिक : नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदावर पहिल्यांदाच महिला विराजमान होणार आहे. कारण सत्ताधारी भाजपाकडून हिमगौरी अहेर-आडके यांनी अर्ज दाखल केला तर विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे दोन महिलांमध्ये सरळ सामना होणार असला तरी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने हिमगौरी अहेर-आडके यांची निवड निश्चित आहे. येत्या शनिवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. Nashik Municipal corporation standing committee himgouri Aakade Next Sabhapati
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपाकडून प्रभाग ७ मधील नगरसेवक हिमगौरी अहेर-आडके यांनी नगरसचिव राजेंद्र गोसावी यांच्याकडे सादर केला. हिमगौरी अहेर यांनी तीन अर्ज दाखल केले. सूचक-अनुमोदक म्हणून त्यांच्या अर्जावर महापौर रंजना भानसी, भाजपा गटनेता संभाजी मोरूस्कर, शांता हिरे, गणेश गिते, हेमंत शेट्टी, जगदीश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दुसरीकडे विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता अमोल जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला. जाधव यांचे दोन अर्ज सादर करण्यात आले. त्यांच्या अर्जावर सूचक-अनुमोदक म्हणून कॉँग्रेसचे समीर कांबळे व सेनेचे प्रवीण तिदमे, भागवत आरोटे व संतोष साळवे यांच्या स्वाक्ष-या आहेत.नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भाजपा ९, शिवसेना ४, काँगेस १, राष्टवादी १ आणि मनसेच्या कोट्यातील अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.
Nashik Municipal corporation standing committee himgouri Aakade Next Sabhapati
Like Our Page : https://www.facebook.com/NashikOnWeb/