शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला प्रारंभ; मुंबई नाका येथून मुंबईकडे प्रस्थान

शेतकऱ्यांचा लॉंग मार्चचे मुंबईकडे प्रस्थान झाले असून कालपासून सुरू असलेली मंत्री गिरीश महाजन यांची मध्यस्थी कॉम्रेडस समोर निष्फळ ठरली.

Nashik Mumbai Long March 2019

रस्त्यात वाहने अडवल्यामुळे महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांना मुंबई नाका, नाशिक येथे येण्यास वेळ झाला तसेच महाजन यांच्या मध्यस्तीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे काल बुधवारी (दि. 20) मुंबईकडे रवाना होणारा मार्च आज गुरुवारी (दि. 21) सुरू झाला.

शेतकऱ्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न सुरू असून पर्यटन तथा रोहयो मंत्री जयकुमार रावल किसान मोर्चेकऱ्यांना भेटणार आहेत. ना. रावल दुपारी 3 ते 3.30 ला मोर्चेकर्यांना भेटण्यासाठी मुंबईहून निघाले आहेत. मोर्चेकऱ्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करणार येणार आहे.

नाशिकमध्ये भुजबळ काका पुतण्या मोर्चा प्रारंभ होण्याच्या ठिकाणी जाऊन तेथे शेतकऱ्यांना भेटले आहेत. मनसेचे नेते माजी आमदार नितीन भोसले पाण्याच्या प्रश्नाच्या मागणीवरून पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले आहेत.

का निघतोय वर्षभरानंतर पुन्हा एकदा लॉंग मार्च?

वर्षभरापूर्वी नाशिकवरून मुंबईत हजारो ते लाखोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी कष्टकरी यांनी पायी धडक देत फडणवीस सरकारकडे विविध मागण्यांचे गाऱ्हाणे मांडले होते; मात्र वर्ष उलटूनदेखील त्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने पुन्हा एकदा महाराष्टतील शेतकरी, आदिवासी बांधव अखिल भारतीय किसान सभेने दिलेल्या ‘लॉँग मार्च’च्या हाकेला प्रतिसाद देत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.

दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा,महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा, या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर आज पुन्हा नाशकातून मुंबईच्या दिशेने ‘लाल वादळ’ उठले आहे. बुधवारी दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी नाशिक मुक्कामी होते.

आठवडाभरात हजारोंच्या संख्येने आंदोलक विधानसभेला घेराव करणार असल्याचे सांगण्यात आले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.