ylliX - Online Advertising Network

इन्होवाचे भर वेगात टायर फुटले, आदळली विरुद्ध बाजूच्या ट्रॅकवर, तीन युवक ठार

नाशिक मुंबई महामार्गावर (Nashik Mumbai Highway Accident ) दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात नाशिकचे तीन तरुण ठार झाले असून,दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कारचे एक टायर फुटल्याने गाडी दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. सोमवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे.

Enova car

सविस्तर वृत्त असे की नाशिक येथील रहिवासी असलेले रोहित शिवाजी पवार (२७ रा. अभिमन्यू अपार्टमेंट शिंगाडा तलावाजवळ नाशिक), प्रफुल्ल धनंजय प्रभू (२२ रा.अभिमन्यू सोसायटी शिंगाडा तलावाजवळ नाशिक) व दानिश जनाउद्दीन सिद्दिकी (२२ रा. शंकर नगर, द्वारका नाशिक) या तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिक येथील सर्व पाच जण आपले काम आटोपुन मुंबईहून इनोव्हा कार क्र . एम.एच.१५ डी सी ७१६० ने नाशिक कडे निघाले होते, पहाटे दोन वाजेच्या सुमारास कार गोंदेदुमाला जवळ प्रभु धाब्यासमोर जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून नाशिककडून मुंबईकडे जाणा-या ट्रक क्र .एम पी ०९ एच एच ७६५९ या ट्रकवर जावून धडकली होती.

ही धडक इतकी भीषण होती की इनोव्हा कारचा चक्काचुर झाला आहे. यामध्ये कार चालक साहिल दिनेश रावल व गणेश (बंटी )अनिल पवार हे दोघे जण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका, घोटी टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेने लगेच यास्थळी पोहोचले त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोबतच पोलिस उपअधीक्षक श्रीमती राणे आणि पो.नि. देशमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.