74 व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगर क्षेत्राकरिता महानगर नियोजन समिती स्थापन करावी लागते. 2008 च्या शासन अधिसूचनेनुसार नाशिक हे महानगर क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या नियोजन समितीमधील 45 सदस्यांपैकी दोन तृतियांश म्हणजेच 30 सदस्य हे निवडणूकीद्वारे निवडून द्यावयाचे आहेत. या व्यतिरिक्त शासन निर्देशित पदसिद्ध सदस्य, शासन नाम निर्देशित सदस्य, नगरविकास, नागरी पायाभूत सुविधा, नागरी परिवहन, पर्यावरण यातील तज्ज्ञ आणि विशेष निमंत्रितांची पुढीलप्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षासाठी असणार आहे.
शासन नामनिर्देशित सदस्य :
प्रधान सचिव-1, नगरविकास विभाग, मुंबई आणि विभागीय आयुक्त, नाशिक विभाग हे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. तर विधानसभा सदस्य श्रीमती देवयानी सुहास फरांदे, विधानसभा सदस्य श्रीमती सीमा महेश हिरे, आयुक्त, नाशिक महानगरपालिका, प्रशासक सिडको, नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नगर परिषद, भगुर नगर परिषद, सिन्नर नगर परिषद या नगरपरिषदांसह देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्याधिकारी हे शासन नामनिर्देशित सदस्य असणार आहेत.
नगर विकास, नागरी पायाभूत सुविधा, नागरी परिवहन, पर्यावरण यातील तज्ज्ञ :
निवृत्त संचालक, नगररचना तथा नगर नियोजन तज्ज्ञ अरुण रा. पाथरकर, निवृत्त सहसंचालक, नगररचना तथा वाहतूक व परिवहन तज्ज्ञ भ.व.कोलटकर, प्राचार्य एम.व्ही.पी.कॉलेज ऑफ आर्क्टिटेक नाशिक तथा पर्यावरण तज्ज्ञ प्राजक्ता बस्ते (एम.आर्क, एन्व्हार्मेट लँड स्केप), उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, (उत्तर महाराष्ट्र विभाग) नाशिक तथा व्यापार उद्योग, शेती यातील तज्ज्ञ,
विशेष निमंत्रित :
लोकसभा सदस्य हेमंत तुकाराम गोडसे, लोकसभा सदस्य हरिश्चंद्र देवराम चव्हाण, विधानसभा सदस्य बाळासाहेब महादु सानप, विधानसभा सदस्य योगेश (बापू) बबन घोलप, विधानसभा सदस्य अनिल साहेबराव कदम, संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक, प्रादेशिक विभाग, महासंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी), नाशिक, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुख्याधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, नाशिक, मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, नाशिक, विभागीय नियंत्रक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नाशिक विभाग, महाव्यवस्थापक, भारत संचार निगम लि., नाशिक, प्रतिनिधी सिव्हील एव्हिएशन/एअर पोर्ट ॲथॉरिटी, नाशिक्, सब एरिया कमांडर, हेडक्वार्टर सब एरिया, नाशिक यांची विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. समितीचे सचिव सह संचालक, नगर रचना, नाशिक विभाग असणार आहेत.