ylliX - Online Advertising Network

रंजना भानसी महापौर, प्रथमेश गिते उपमहापौर स्थायी वर भाजपचे वर्चस्व

नाशिक महापालिका महापौर, उपमहापौर निवडीला गती प्राप्त झाली आहे. या करिता भाजपाचे सर्व विजयी उमेदवार एकूण ६६ नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी केली आहे. तर उद्या ७ मार्चला महापौर पदाकरिता अर्ज दाखल केला जाणार आहे. सर्वाधिक नगरसेवक म्हणून भाजपा मोठा पक्ष असून त्यांच्या कडून जेष्ठ नगरसेविका रंजना भानसी तर उपमहापौर म्हणून माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र प्रथमेश गीते अर्ज भरणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

नाशिक स्थायी समिती निर्माण करण्या साठी नगर सचिव आयो विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये सर्व ठिकाणी भाजपाची छाप असणार आहे. यामध्ये १२२ पैकी ६६ नगरसेवक भाजपाचे आहेत. तर स्थायी समिती १६ सदस्य आहेत. यामध्ये संख्याबळ पाहता भाजपाला ९ सदस्य,शिवसेना ५ सदस्य अत्र आघाडी ला प्रत्येकी एक असे २ सदस्य मिळनार आहे. तर महपालिका आर्थिक चावी भाजपाकडे पाचही वर्षे राहणार  आहे.

यावर्षी महापौर अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षित आहे. तर भाजपच्या नियोजना नुसार दर सव्वा वर्षांनी एक महापौर असा बदल केला गेला आहे. यानुसार या सत्तेच्या वर्षात ४ नगरसेवक महापौर पदाचा मान मिळवणार आहेत.

  • नाशिक भाजपा तर्फे नगरसेविका सौ.रंजना ताई भानसी- महानगरपालिकेसाठी #महापौर पदासाठी निवड
  • नाशिक भाजपा तर्फे नगरसेवक श्री प्रथमेश वसंतराव गीते- #नाशिक महानगरपालिकेसाठी #उपमहापौर पदासाठी निवड
  • नाशिक भाजपा तर्फे नगरसेवक श्री.संभाजी- #नाशिक महानगरपालिकेसाठी #गटनेता पदासाठी निवड
  • निर्णय स्थानिक स्तरावर
  • प्रदेश ठरवणार अंतिम उमेदवार
  • उद्या ७ मार्चला अर्ज भरणार
  • १४ मार्च रोजी निवड होणार महापौर पदाची
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.