ylliX - Online Advertising Network

वेगात असलेल्या कारचे टायर फुटून अपघात दोन ठार

साईबाबांच्या दर्शनासाठी खामगाव येथून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला

वेगात असलेल्या चारचाकीचे टायर रस्त्यात अचानक फुटले. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये २ जण जागीच ठार झाले आहेत.  तर सोबत प्रवास करणारे  दोघे  गंभीर जखमी झाले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनमाड-मालेगाव महामार्गावर अपघात झाला आहे. अपघातामधील जखमींना मनमाडच्या जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मालेगावहून – मनमाडकडे  वेगाने जाणाऱ्या कारचे (एमएच-२८एएन-४७५१) टायर अचानकपणे  फुटले होते. त्यामुळे ती कार अनेकदा  पलटी झाली. यामुळे २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  कुंदलगावनजीक ही घटना घडली आहे. अपघाताची घटना घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत अपघातामधील जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले होते. विशाल लेखवाणी, हर्षल खानचंदानी हे दोन भाविक ठार तर लखन पेशवाणी व सनी पेशवाणी हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यातील दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करा  : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.