मॅंगो काळ्या हत्या प्रकरण : दोघांना अटक, १९ पर्यंत कोठडी

नाशिक : पंचवटीत झालेल्या मॅंगो काळ्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पंचवटी भागातील असलेल्या गौरी पटांगण भागात असलेल्या नवीन भाजीबाजार परिसरात ही हत्या झाली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी सागर उर्फ माही अनिल कुमावत (२३ रा. शीतल देवी चौक, जुने नाशिक), राहुल अशोक शेळके (२७ रा. गौरी पटांगण, पंचवटी, नाशिक), नरेश मंगेश पाटील (२३ रा. राहुल वाडी, पेठ रोड, नाशिक) यांना अटक केली असून वैयक्तिक कारणामुळे हत्या झाल्याचे समोर आले आहे. सर्व आरोपींना १९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दिनांक १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री जमावाने मोहन वसंत गवळी उर्फ मॅंगो काळ्या सराईत गुन्हेगाराला बेदम मारहाण केली होती. पोलिसांनीच या गुन्हेगारास जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते मात्र पहाटे त्याचा उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

१२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री नवीन भाजी मार्केट परिसरात काही अनोळखी लोकांनी गवळीला बेदम मारहाण केली होती. यामध्ये तो भयंकर जखमी झाला होता. पंचवटी पोलिस ही घटना होत असताना पोहोचले तेव्हा मारेकरी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. पोलिसांनी गवळीला लगेच जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री दाखल केले होते. मात्र तो अर्ध मेला झाला होता. तर त्याच्यावर होत असलेल्या उपचारांना तो साथ देत नव्हता. सकाळी त्याचा मृत्यू  झाला.

गवळी वर या आगोदर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. यामध्ये जबरी चोरी करणे, मारहाण करणे, घरफोडी , जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी वसूल करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.