Ration Shop Corona Insurance जूनचे धान्य उचलणास नकार ; विम्याच्या मागणीवर ठाम राहून रेशन दुकानदारांचा 100% बंद

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : कोरोना संकटात शासनाने आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या रेेेशन दुकानदारांंना विमा कवच द्यावे या मागणीवर रास्तभाव रेशन दुकानदार संघटना ठाम असून जुन महिन्याचे धान्य उचलण्यास व वाटपास नकार दिला आहे. संघटनेकडून सोमवारी (दि.1) जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना विमा संरक्षण मिळावे यासाठी निवेदन दिले आहे. Ration Shop Corona Insurance

दरम्यान मे महिन्याचे धान्य वाटपास ३ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्याचे वाटप दुकानदारांकडून सुरु आहे.

शासनाने डाॅक्टर, पोलिस व सरकारी कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले. पण करोना संकटात जीव धोक्यात घालून धान्य वाटप करणार्‍या रेशन दुकानदारांना विमा संरक्षण दिले नाही. त्यामुळे विमा संरक्षण हवे या मागणीसारठी रेशन दुकानदारांनी जूनचे धान्य वाटपास नकार दिला आहे.

जिल्ह्यात एकूण 2600 रेशन दुकाने असून इ पॉज थांबवून थेट धान्य वाटप करण्यास परवानगी देण्यात आली.

तामिळनाडूत रेशन दुकानदारांना मानधन देण्यात येत आहे. तसे मानधन देण्यात यावे अशीही मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून रेशन दुकानदार विमा संरक्षणाची मागणी करत आहेत. आजच्या स्थितीत आरोग्य, महसूल, पोलीस, स्वच्छता, होमगार्ड या अत्यंत आघाडीवर काम करत असलेल्या विभागांसोबतच धान्य पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदारही जीवावर उदार होत करोना संकटात काम कर्तव्य बजावत आहे. शासनाकडून येणारे अन्नधान्य गोरगरिब कार्डधारकांच्या हाती दुकानदारच देत आहे. त्यांच्या हजारो नागरिकांशी रोज थेट संपर्क येत आहे. त्यामुळे दुकानदार हा कोरोना संकटात जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा देत आहेत.

मुंबईत एका दुकानदाराला तर करोनाही झाला. त्यामुळे दुकानदारांनाही विमा संरक्षण देण्याची मागणी रास्त भाव रेशन दुकानदारांच्या राज्य संघटनेने मार्च महिन्यापासून केली आहे. पण शासनाने ही फाईल वित्त विभागाकडे गेली असल्याने त्यावर विचार सुरु असल्याचे अश्वासन दिले.

संघटनेने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना निवेदन दिले. तरी देखील मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मे महिन्याचे धान्यवाटप संपल्यानंतर 4 जून पासून दुकानदार 100% संपावर जाणार आहेत. Ration Shop Corona Insurance

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.