ylliX - Online Advertising Network

कल्याण-नाशिक आणि कल्याण-पुणे दोन तासात १२ डब्यांची लोकल, सर्व ठिकाणी थांबे

कल्याण ते नाशिक अंतर दोन तास

नाशिक : नाशिककर आणि पुणेकर आनंदाची बातमी आहे, नाशिक ते कल्यान आणि कल्यान ते पुणे लोकल लवकरच सुरु होत आहे. या सेवेसाठी लोकलमध्ये असलेल्या अत्यावश्यक ब्रेक सीस्टिमसह, उच्चदाब शक्ती, इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स ट्रेनसह ३२ चाकांना पार्किंग ब्रेकची सुविधा या लोकलमध्ये असणार आहे. सोबतच मध्य रेल्वेवर चालविण्यात येणाऱ्या लोकलपेक्षा या लोकलची विशेष बांधणी रेल्वेने केली आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात  बारा डब्यांची लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल होणार आहे. नाशिक व पुणे  येथील प्रवाशांना लवकरच या लोकल सेवेला लाभ घेता येणार आहे. नाशिक – कल्याण मार्गावरील जवळपास सर्वच महत्वाच्या स्थानकावर ही लोकल थांबणार असून प्रवास फक्त दोन तासात होणार आहे.

मध्य रेल्वेसाठी सहा ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून बनविण्यात आल्या आहेत. या लोकलची चाचणी फॅक्टरीत घेतली गेली आहे. तर व्यवहारिक चाचणीसाठी ही लोकल कुर्ला कारशेडमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला  दाखल होणार आहे. या वेळी योग्य ती  चाचणी पूर्ण करत लवकरच लोकल सेवा सुरू करण्यात येईल.

सीएसएमटी स्थानक ते नाशिक अशी लोकल सेवा सलग नाही. सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते नाशिक व कल्याण पुणे अशी लोकल सेवा सुरू होत आहे.

एवढा लांबचा पल्ला गाठण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नाही. १५० किमीपर्यंतच लोकल सेवा उपलब्ध असते. त्यापुढील अंतर कापण्यासाठी शौचालय, बाथरूम व इतर सुविधांची पूर्तता लोकलमध्ये करावी लागते. सध्यातरी लोकलमध्ये या सुविधा नाहीत. त्यामुळे सीएसएमटी ते नाशिक आणि पुणे अशा सलग लोकल प्रवासाऐवजी कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे अशी लोकल सेवा उपलब्ध होणार आहे. या बाबत माहिती रेल्वे  सूत्रांनी दिली आहे.

सर्व स्थानकांवर लोकल थांबणार आहे.

सीएसएमटी ते नाशिक दरम्यानचे रेल्वे अंतर १७२ किमी आहे. तर सीएसएमटी ते पुणे दरम्यानचे रेल्वे अंतर १९२ किमी  आहे.मुंबई ते नाशिक आणि मुंबई-पुणे अंतर कापण्यासाठी ३ ते ३.३० तासांचा अवधी लागणार. कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे अंतर कापण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार आहे. नाशिक आणि पुणे दरम्यान सर्व स्थानकांवर लोकलला मिळणार थांबा आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्ग, विद्यार्थी आणि मुंबई येथे कामाला जाणारे यांना मोठा फायदा होणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.