Igatpuri Resort RaveParty इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांची रेव्ह पार्टी

इगतपुरी (नाशिक) : इगतपुरीत आज पहाटेच्या सुमारास  मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर रेव्ह पार्टीची गुप्त बातमी मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धाड मारून केली कारवाई केली.Igatpuri Resort RaveParty

सदर विलात रेव्ह पार्टी चालू होती. या पार्टीमध्ये फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या 4 महिलांचा समावेश तसेच एक बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचा समावेश आहे. यात दहा पुरुष व बारा महिलांचा समावेश होता. एकूण 22 जणांवर कारवाई करण्यात आली.

इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत धाड टाकली होती. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली.

Igatpuri Resort RaveParty
Igatpuri Resort RaveParty

रेव्ह पार्टीमध्ये 22 जणांचा समावेश

स्काय ताज विलामध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचं छापेमारी समजलं. या पार्टीत मनोरंजन विश्वातील चार महिला सापडल्या. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही यात समावेश आहे. एकूण 22 जणांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ताब्यात घेतलं होतं.

पोलिस अधीक्षक प्रतिक्रिया व व्हीडियो :

बॉलिवूड अभिनेत्रीला ड्रग्ज पार्टीसाठी अटक

दुसरीकडे, वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी मुंबईत अटक करण्यात आली होती. सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संबंधित अभिनेत्री मित्रांसोबत ड्रग्ज पार्टी करताना रंगेहाथ सापडली होती. बॉलिवूडमध्ये लहान मोठे रोल करणाऱ्या या अभिनेत्रीला पोलिसांनी पकडलं होतं.

अभिनेत्रीला मित्रासोबत अटक

पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून या प्रकाराची शहानिशा केली. त्यानंतर अभिनेत्रीला मित्रासोबत अटक करण्यात आली. हॉटेलच्या एका रुममध्ये ती चरस पित असल्याची माहिती आहे.

जामिनावर मुक्तता

तिचा साथीदार आशिक हुसैन यालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला. दोघांना कोर्टात हजर केलं असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. तिने आतापर्यंत बॉलिवूडसह काही तेलुगू चित्रपटातही काम केलं आहे.Igatpuri Resort RaveParty

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.