Nashik Family Murder नाशिक हादरले : एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन निर्घृण हत्या

पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांच्या हत्याकांडामुळे नाशिक हादरलं आहे. नांदगावमध्ये घराबाहेर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. (Nashik Family Murder)

तालुक्यातील वाखारी शिवारात एकाच कुटुंबातील चौघांची धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना उघडकीस आली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. तर या हत्या आर्थिक किंवा अनैतिक संबंधातून केल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

घटणास्थळ

मिळालेली माहिती अशी की, नांदगाव (जि. नाशिक) तालुक्यातील वाखारी शिवारातील जेऊर रोड परिसरात असणाऱ्या वस्तीवर चव्हाण कुटुंबीय राहत होते. काल गुरूवारी (दि ६ रोजी) रात्रीच्या वेळी समाधान आण्णा चव्हाण (व ३७) हे पत्नी भरताबाई समाधान चव्हाण (व ३२) मुलगा गणेश समाधान चव्हाण (व ६) आणि मुलगी आर्या समाधान चव्हाण (वय ४) यांच्या समवेत घराबाहेर रात्री झोपले होते. त्यावेळी ४ ते ५ अनोळखी व्यक्तींनी चव्हाण कुटुंबातील चौघांच्या मानेवर डोक्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. यातच या चौघांचाही मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. 

समाधान आण्णा चव्हाण यांचे घरे वाखारी गावापासून जेऊर रोडला १ कि. मी. अंतरावर असून त्यांच्या घराच्या आसपास १०० मीटर पर्यंत इतर कुणाचे घर नाही. शिवाय घराशेजारी मका बाजरीची शेती असल्याने दूरपर्यंत कोणी दिसत नाही. त्यामुळे रेकी करून रात्रीच्या अंधाराचे नियोजन करून हे खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस मालेगाव, नांदगाव, पो नि व त्यांचा ताफा दाखल झाला. त्यांना काही अंतरावर रक्ताने माखलेला कुऱ्हाडीचा लाकडी दांडा मिळाला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.Nashik Family Murder

दरोडेखोर की मनोविकृत ? अशी चर्चा सध्या आहे. सर्वसाधारण कुटुंबातील चौघे रात्री मळ्यातल्या घरातल्या ओसरीत झोपलेले होते. रक्ताच्या थारोळ्यात चौघांचे मृतदेह आढळून आल्यानै मोठी खळबळ उडाली. समाधान रिक्षा चालवित असे पण लाँकडाऊनमुळे तोही घरीच होता.बायको भरताबाई मोलमजूरी करीत असे. (Nashik Family Murder)

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.