दुष्काळ पाहणी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- गिरीष महाजन

नाशिक  देवळा आणि बागलाण तालुक्यातील बहुतेक भागात कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर असून या भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभाक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.nashik facing drought situation government helping farmers asap 

बागलाण तहसिल कार्यालय येथे देवळा व बागलाण तालुक्यातील टंचाईसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार डॉ.राहुल आहेर, दिपीका चव्हाण, पंचायत समिती सभापती विमलताई सोनवणे, उपसभापती शितल खोर, उपविभागीय अधिकारी प्रविण महाजन, तहसिलदार प्रमोद हिले, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, केदा आहेर आदी उपस्थित होते.nashik facing drought situation government helping farmers asap 

दुष्काळ पाहणी दौरा

महाजन म्हणाले,भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी केळझर डावा कालव्यासाठी 4 कोटी 80 लाखाची आणि केळझर चारी क्र.8 ला 4 कोटी 95 लाखाची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही चारी भाक्षी-मूळाणेपर्यंत मंजूर असून चौगाव, कऱ्हे, अजमीर सौंदाणे, वायगाव असा कालवा वाढविण्यात येणार आहे.nashik facing drought situation government helping farmers asap 

मापदंडात बसत नाही म्हणून पूर्वी नामंजूर करण्यात आलेला हरणबारी उजवा कालवा मापदंडात बसविण्यात आला असून पारनेरपासून वायगाव-सातमानेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या कालव्यामुळे 21 दुष्काळी गावांना लाभ होणार आहे. हरणबारी डाव्या कालव्याचे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तळवाडे-भामेर एक्स्प्रेस कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.nashik facing drought situation government helping farmers asap 

    ते म्हणाले, या भागातील मका, कांदा, भुईमूग पिकाचे बऱ्याचअंशी नुकसान झाले आहे. तर उडीद आणि मुगाचेही काही प्रमाणात नुकसान दिसून येत आहे. पेरणीनंतर पाऊस न आल्याने नुकसानाची तीव्रता अधिक आहे. शासनाने नव्याने पाहणी करण्याच्या सुचना दिल्या असून सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुष्काळ सदृश परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन आढावा घेण्याच्या सुचना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.nashik facing drought situation government helping farmers asap 

शेतकरी वर्गाशी संवाद साधत पूर्ण माहिती घेतांना पालकमंत्री !

    तत्पूर्वी श्री.महाजन यांनी दोन्ही तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या चेहळी, मेशी, कुंभार्डे, हरीपाडा,अजमीर सौंदाणे, देवळाणे गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पिकांची पाहणी केली. त्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी वर्गासाठी रोजचे मुख्य पिकांचे बाजार भाव !

लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : सोयाबीन,डाळींब, टमॅटो 15 ऑक्टोबर 2018

nashik facing drought situation government helping farmers asap 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.