ylliX - Online Advertising Network

भाजपाच्या माजी नगरसेवकाची महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पाच दिवसांची पोलीस कोठडी

महिलेची आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार 

नाशिक : एका बाजूला नरेंद्र मोदींच्या जीवावर यशाची शिखरे पादाक्रांत करताना महाराष्ट्र भाजपाच्या खान्देशातील मोठ्या नेत्याच्या मर्जीतील नगर सेवकाने लज्जास्पद काम केले आहे. नाशिक महानगर पालिकेचा स्वीकृत नगरसेवक पद भूषविणाऱ्या माजी नगरसेवक विक्रांत चांदवडकरने एका महिलेला फेसबुक या सोशल मिडियावरून शरीर सुखाची मागणी करणारा अश्लिल मेसेज पाठवल्याचे उघड झाले असून, याबद्दल महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. nashik ex bjp corporator demands sex crime police custody

यावर पोलिसांनी कारवाई करत चांदवडकरला अटक करत न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, भाजपचा माजी स्वीकृत नगरसेवक विक्रांत चांदवडकर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे महिलेला अश्लील मेसेज पाठवत होता. अशाप्रकारचे मेसेज पाठवून त्याने मानसिक छळ केला आणि या महिलेकडे त्याने शरीर सुखाची मागणी केली असा गंभीर आरोप महिलेने केला आहे. या महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत पुराव्यांसह सर्व घटना सांगितली आहे.

मात्र फिर्याद दाखल करण्याआगोदर या पीडित महिलेने नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट हा सर्व प्रकार कथन केला. नंतर सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आणि नगरसेवक चांदवडकरला अटक केली आहे.  

या प्रकरणी चांदवडकरला न्यायालयात हजर केले होते, न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सोबतच चांदवडकर याने महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

या विषयी भाजपा पक्षातून या प्रतिमा मलीन करण्यारया घटनेमुळे  चिंता व्यक्त केली आहे.

कोण आहे हा विक्रांत चांदवडकर?

चांदवडकर याची आगोदर पासून पक्षातील मोठ्या नेत्यांसोबत उठबस होती. सोबत हा नगरसेवक पालकमंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय देखील आहे अशी चर्चा आहे. त्याने या आगोदर एका मोठ्या पदाधिकाऱ्यांची बडदास्त ठेवताना हेलिकॉप्टरची सोय केली होती त्यामुळे तो चर्चेत आला होता.

तेव्हापासून त्याचे पक्षातील महत्त्व वाढले होते. मात्र आता पोलिसांनी कठोर कारवाई केली असून त्याची रवानगी कोठडीत झाली आहे.

nashik ex bjp corporator demands sex crime police custody

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.