ylliX - Online Advertising Network

इलेक्ट्रिक बसची प्राथमिक चाचणी , रस्त्यावर धावतांना उभ्या राहिल्या अनेक अडचणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये लवकरच नव्या स्वरूपात सार्वजनिक बस सेवा सुरु होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत ही सेवा सुरु होणार आहे. या बसची आज प्राथमिक चाचणी घेण्यात आली आहे. बस उत्तम आहे मात्र शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे आणि बेलगाम पार्किंग मुळे या बसला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे खरंच शहरात स्मार्ट पार्किंग आणि इतर कामे योग्य पद्धतिने सुरु आहेत का ? यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात येत्या काही दिवसांत महापालिकेची बससेवा सुरू होणार असून यासाठी  इलेक्ट्रिकल बसेस वापरता येणार आहेत. हैद्राबाद येथील कंपनीची एकमेव निविदा प्राप्त झाल्याने तिला मंजुरी देण्याची प्रक्रिया मनपाने सुरु केली आहे. बसेस शहरातील रस्त्यांसाठी किती व्यवहार्य ठरतील यासंदर्भात तपासणी करण्यात आली. महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता सतीश सोनवणे यांसह अधिकारी उपस्थित होते. electric bus

या बसची अनेक वैशिष्ट्ये आहेत.  

ही बस एकदा चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकते तर याचे चार्जिंग चार ते पाच तासांत पूर्ण होईल. सोबतच शहरातील वाहतूक पाहता बसचा वेग ताशी ७० किलोमीटरची कमाल वेग असणार आहेत. या बसचे लोकेशन जीपीएसच्या माध्यमातून ऑनलाइन समजणार आहे. तर  तापमान तपासणीसाठी बॅटरीला सेंसरची व्यवस्था आहे. या बसमध्ये ३९ प्रवाशी क्षमता ,स्वयंचलित गिअर , वातानुकूलीत यंत्रणा असणार आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये इतर बस सारखे इंजिन नसल्याने हादरे बसणार नाहीत तर     इलेक्ट्रीवर धावणार असल्याने प्रदूषण नाही.  या बसमध्ये     चालक नियंत्रित हायड्रोलिक दरवाजे असणार आहेत. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, मोबाईल चार्जिंगची सुविधा ,पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम, थांब्यांची माहिती देणारा डिजिटल बोर्ड,     इमर्जन्सी स्टॉप बटन असे अनेक फीचर्स यामध्ये असणार आहेत. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.