थंडीचा कहर : निफाड राज्यात सर्वात थंड १.८ सेल्सिअस तर नाशिक ५.७

तीन दिवस थंडीचा तडाखा जोरदार जाणवणार

नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचा कडाका असलेले शहर म्हणून निफाड नोंदविले गेले आहे. निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील निचांक गाठला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी येथील क्रुषी संशोधन केंद्रावर १.८ अंश इतकी तापमानाची नोंद झाली आहे. तर तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या उगांव शिवडी सोनेवाडी भागात द्राक्षबागांत दवबिंदुंची बारिक बर्फाची झालरं तयार झाली होती. सकाळी हवामान केंद्राकडून शहराचे किमान तापमान ५.७ अंश मोजण्यात आले आहे.

मागील पंधरा दिवसात थंडी वाढली आहे. मात्र कमी तपमान असतांना अचानक १२.६ अंश नोंदवले गेले होते. तर अचानक पुन्हा पारा घसरला आणि तपमान ५.७ नोंदवले गेले आहे.

मागील पंधरवड्यापासून शहरात थंडीचा जोर वाढलेला होता. बुधवारी  दि.१९ हे  ७.९ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. गुरूवारी पारा पुन्हा अचानक वेगाने १२.६ अंशावरून थेट ५.७ अंशापर्यंत खाली घसरला.  बुधवारी संध्याकाळपासून वेगाने थंड वारे वाहू लागल्याने नाशिककर गारठून गेले होते. रात्री या थंड वाऱ्याचा वेग अधिकच वाढल्याने किमान तपमान अचानकपणे खाली कोसळले. त्यामुळे गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे आलेल्या शीतलहरीमुळे पुन्हा गुरूवारी कमाल, किमान तपमानात मोठी घसरण झाली. तीशीपार गेलेले कमाल तापमना थेट २६अंशापर्यंत खाली आले. तर पुढील तीन दिवस म्हणजे ३० तारखे पर्यंत शीत लाट असून काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

cold-in-nashik city winter weather low temperature
Cold wave nashik

मागील वर्षी ७.५ अंश इतक्या तापमानाची नोंद डिसेंबरअखेर झाली होती. यावर्षी थेट ५.७ इतकी नोंद झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत थंडीचा कडाका प्रचंड जाणवत आहे.

या कडाक्याच्या थंडीने द्राक्षमालाची फुगवण थांबली आहे. तर थंडीचा पारा घसरल्याने परिपक्व द्राक्षमणी तडकुन नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान सदरचे तापमान हे कोणत्याच पिकाला चांगले नाही. या तापमानामुळे द्राक्षबागेत केवळ‌ द्राक्षांनाच नव्हे तर द्राक्षवेलीतील पेशींनाही जखमा होण्याचा धोका आहे. द्राक्षबागांना ठिबकद्वारे पाणी देणे गरजेचे असते मात्र भारनियमनाच्या त्रासाने तेही शक्य होत नसल्याचे सोनेवाडी येथील  प्रगतिशील द्राक्ष निर्यातदार तथा द्राक्ष बागायतदार संघाचे माजी संचालक बाळासाहेब सानप यांनी सांगितले आहे.

Like Our Facebook Page click link : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.