ylliX - Online Advertising Network

जिल्हा न्यायालयाचे विस्तारीकरण : नव्या जागेत चार न्यायालयांची निर्मिती, कामकाज सुरू

नाशिक जिल्हा न्यायालयाचे विस्तारीकरणासाठी नाशिक पोलीस मुख्यालयाकडून अडीच एकर जागा हस्तांतरित करण्यात आली होती. नाशिक बार असोसिएशनच्या प्रयत्नातून मिळालेल्या जागेत दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर या चार न्यायालयांची निर्मिती करण्यात आली आहे. Nashik District Court Expansion New Premises Bar Association Police Headquarters

आज सोमवार (दि.४) रोजी सकाळी 10 वाजता या न्यायालयांचा उद्घाटन समारंभ मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुपेरिटेंडेंट इंजिनीअर श्री हांडे उपस्थित होते. Nashik District Court Expansion New Premises Bar Association Police Headquarters

जुन्या आवरासह नव्या जागेच्या उपलब्धतेमुळे न्यायालयीन कामे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. बार असोसिएशनच्या प्रयत्नांमुळे पोलीस मुख्यालयाची ही अडीच एकर जागा न्यायालयीन कामासाठी उपलब्ध झाली आहे.

जमिनीचे हस्तांतरण करून बरेच दिवस उलटूनही येथे कामकाज सुरू झाले नव्हते. त्यामुळे नवीन जागेत कामकाज सुरू करण्याचा सोहळा जणू आयोजित झाला. नाशिक बार असोसिएशन व नाशिक जिल्हा न्यायालय प्रशासन यांच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितिन ठाकरे, बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभवे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर उपस्थित होते.

Nashik District Court Expansion New Premises Bar Association Police Headquarters

त्याचप्रमाणेनाशिक बार अससोसिएशनचे पदाधिकारी अ‍ॅड. प्रकाश आहुजा, अ‍ॅड. जालिंदर ताडगे, अ‍ॅड. शरद गायधनी, अ‍ॅड. सौ. श्यामला दीक्षित, अ‍ॅड. संजय गिते, अ‍ॅड. हर्षल केंगे,अ‍ॅड. महेश लोहिते, अ‍ॅड. शरद मोगल अ‍ॅड. सोनल कदम, अ‍ॅड. कमलेश पाळेकर, अ‍ॅड. श्रीधर माने, अ‍ॅड. बापुसहेब गायकर, अ‍ॅड. जी. पी. सानप, अ‍ॅड. सचिन धारराव, अ‍ॅड. पी.आर. गिते व इतर वकील मंडळी हजर होते. सदर कार्यक्रमास न्यायाधिशवर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.

(Press Release)

Nashik District Court Expansion New Premises Bar Association Police Headquarters
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.