ylliX - Online Advertising Network

तर माझी बदली करा, मुंढे यांची अविश्वास ठरावावर प्रतिक्रीया

नाशिक :माझ्या बदलीने नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर माझी बदली करा अशा शब्दात नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्ताववर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. याआधी सोमवारी नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. आता सदरच्या अविश्वास प्रस्तावावर येत्या १ सप्टेंबरला चर्चा होणार आहे.nashik development transfer me nmc commissioner tukaram mundhe news
इतर ठिकाणांप्रमाणे नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावली. सोबतच  व्यवहारामध्ये पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले. अनावश्यक खर्चाला पायबंद घालत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घातला. या घडामोडींमुळे भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांचे आर्थिक समीकरण विस्कटली. अखेर सत्ताधारी भाजपाने मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.nashik development transfer me nmc commissioner tukaram mundhe news
या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी माझी बदली करुन नाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर नक्कीच माझी बदली करावी. माझ्यावर केलेले आरोप निराधार असून करवाढीबाबत संभ्रम निर्माण केला जात आहेअसा आरोपही त्यांनी केला. महापालिकेतील २२ ते २३ गावांमध्ये मातीचे रस्ते असतानाच दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर कोट्यवधीचा खर्च होतो. हा खर्च कशामुळे होतोअसा सवालही त्यांनी विचारला. सोबतच वारंवार बदली होत असल्याने वाईट वाटते. पण शेवटी निर्णय सरकारचा असतो असेही त्यांनी सांगितले.nashik development transfer me nmc commissioner tukaram mundhe news

दुसरीकडे सोशल मिडीयावर मोठ्या संख्येने नाशिककर एकत्र येत असून ‘सपोर्ट तुकाराम मुंडे’ असे म्हणत चळवळ उभी करून रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरु केली आहे. आयुक्तांचे काम आवडले आहे, शहरात सुधारणा होत असल्याचे मान्य करून मुंढे साहेब आम्ही सर्व नाशिककर तुमच्या सोबत आहोत असे सांगून मोठ्या संख्येने आपले मत नोंदवत आहेत.

nashik development transfer me nmc commissioner tukaram mundhe news
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “तर माझी बदली करा, मुंढे यांची अविश्वास ठरावावर प्रतिक्रीया

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.