देवळा तालुक्यातील कुंभार्डे गावात लग्न मांडवाच्या बैलगाडीला जुंपलेले बैल जोडी बॅन्जोच्या होत असलेल्या आवाजाने आणि समोर जमलेल्या गर्दीमुळे अचानक उधळली होती. यात त्यांनी समोरील लोकांवर बैल गाडीसह जात नवरीच्या भावासह जवळपास १५ नागरिक जखमी झाले आहेत. तर दोन जणांच्या अंगावर बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वाना लगेच मालेगाव उप जिल्हारुग्णालयात दाखल केले आहे.
दादाजी विष्णू केदारे यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यामुळे घरासमोर पारंपारिक पध्दतीने मांडव टाकण्यात येणार आहे. यासाठी त्या कार्यक्रमासाठी सकाळच्या सुमारास गावातील मुख्य चौकातुन वाजतगाजत मांडव घराकडे घेऊन जात होते. यासाठी बैलगाडी जुंपण्यात आली होती.
हा घरातील कार्यक्रम असल्याने अनेक नातेवाईक भाऊबंद , गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने आले होते. नेहमी प्रमाणे लग्न म्हटले की संगीत आलेच, यासठी बॅन्जोचा आवाज होत होता आणि बैल गाडी समोर होती जमलेल्या लोकांची गर्दीमुळे बैलगाडीला जुंपलेले बैल अचानक सैरभैर झाले आणि त्यांनी बैलगाडीसह आजुबाजुला सैरावैरा जोरात पळु लागले यावेळी त्यांच्या समोर आलेल्या म्हसु तुकाराम ठाकरे, सदाशिव भागा केदारे, हिरामण ठाकरे, नवरीचा भाऊ राहुल केदारे, देविदास ठाकरे, वैशाली देवरे, जयवंत निरभवणे,साहेबराव ठाकरे आदी जखमी झाले आहेत. त्यापैकी म्हसु ठाकरे व सदाशिव केदारे यांच्या अंगावरु न बैलगाडी गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जमलेल्या इतर नागरिकांनी लगेच मदत बोलावली आणि सर्वाना रुग्णालयात दाखल केले आहे.
(बातमीतील फोटो फक्त संधर्भ म्हणून वापरला आहे.)