अनोख्या पद्धतीने होणार सेलेब्रेशन
नाशिक : आपली मैत्री आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी एक पाउलवाट असलेला दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. हा प्रेमाचा दिवस टँडम सायकल फन राईड करत अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची संधी नाशिक सायकलीस्टस फाउंडेशन सह हर्ष कन्स्ट्रक्शन्स, संजीवनी एन्टरप्रायजेस आणि एसकेडी ग्रुप यांच्यासोबत उपलब्ध झाली आहे. nashik cyclists valentine day tandem cycle fun ride
व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्या मित्र-मैत्रिणी, मुलगी-वडील तसेच जोडप्यांसाठी टँडम सायकल फन राईडचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी (दि. १४) संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान कॉलेज रोड वर प्राचार्य टीए कुलकर्णी सर्कल जवळ ही टँडम सायकल फन राईड सर्वांसाठी खुली असेल.
‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त ‘डिव्हाइन सायक्लोथॉन’चे आयोजन
प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.आपल्या जोडीदाराला खुश करण्याचा या माध्यमातून करण्यात येतो. नाशिक शहरात सायकलचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न करणाऱ्या नाशिक सायकलीस्टसने ही अनोखी फन राईड आयोजित केली असून टँडम सायकल म्हणजे एकाचवेळी दोन लोकांना चालवता येईल असा प्रकार आहे. आणि प्रेम म्हणजे एकमेकांवरचा विश्वास. या निमित्ताने आपले प्रेम आपला साथीदारासोबतच एकाच सायकलवर कॉलेज रोड वर रपेट मारण्याची इच्छा पूर्ण करता येणार आहे.
nashik cyclists valentine day tandem cycle fun ride
यासाठी कोणत्याही पूर्वनोंदणीची आवश्यकता नसून सर्वांसाठीच हा कार्यक्रम खुला असणार आहे. या राईडसाठी आपल्याला वेगळी कुठलीही तयारी करण्याची आवश्यकता नाही. १० टँडम सायकल्स नाशिक सायकलीस्टस तर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे राईड केलेल्यामधून एक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून लकी ड्रॉ विजेत्याला एक टँडम सायकल भेट देण्यात येणार आहे.
या व्हॅलेंटाईन डे निमित्त आपले आई वडील, आपला जोडीदार, मित्र, मैत्रीण यांच्याप्रती तसेच निसर्गाप्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ही अनोखी संधी सोडू नका असे आवाहन नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी केले आहे. nashik cyclists valentine day tandem cycle fun ride
***************************************************************************
प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर माहिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर माहिती पुढील प्रमाणे आहे.
www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page
E-mail id :- nashikonweb.news@gmail.com
Twitter :- https://twitter.com/
Facebook :- https://www.facebook.com/