ylliX - Online Advertising Network

डेक्कन क्लीफहँगरसाठी नाशिक सायकलिस्ट्स रवाना

सायकलिंगची आवड असलेले नाशिकचे पोलीस आयुक्त होणार सहभागी

deccan cliffhanger logo

नाशिक : रेस अक्रॉस अमेरिका अर्थात रॅम या अत्यंत प्रतिष्ठेच्या सायकलिंग स्पर्धेसाठी पात्र ठरवणारी डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेसाठी नाशिक सायकलीस्टसचे सोलो गटात ६ सायकलीस्टस तर टीम ऑफ टू गटात दोन संघ आज शुक्रवारी (दि. ३) सकाळी रवाना झाले. यात सोलो (वयवर्षे ५० व अधिक) गटात नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, ६२ वर्षीय ज्येष्ठ सायकलीस्ट मोहिंदर सिंग भराज तर खुल्या गटात (वयवर्षे १८ ते ५०) किशोर काळे, शुभम देवरे, संजय मोकल, संगमनेरचे विजय काळे यांचा सहभाग आहे. तर टीम ऑफ टूमध्ये संगमनेरचे निलेश वाकचौरे, संजय विखे आणि पिंपळगाव बसवंतचे अविनाश व विकास दवांगे यांचा सहभाग असणार आहे. स्पर्धा पुणे येथून शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता सुरु होऊन गोवा येथील बोग्मालो किनाऱ्यावर संपेल.

deccan cliffhanger participants nashik cyclists cp ravindrakumar singal

या सर्व स्पर्धकांचा हुरूप वाढविण्यासाठी नाशिक सायकलीस्टस कडून आज सकाळी ६:३० वाजता सर्व सायकलीस्टसने मुंबई नाका येथे जमून डेक्कन क्लिफहँगर स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी स्पर्धकांच्या वाहनांपुढे श्रीफळ वाढवून सत्कार करून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, अॅड. वैभव शेटे, योगेश शिंदे, डॉ. मनीषा रौंदळ, राजेंद्र वानखेडे, तुकाराम नवले, मोहन देसाई, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, सचिव नितीन नागरे आदी उपस्थित होते.

 

पुणे ते गोवा अशी ४०० मैल म्हणजेच ६४३ किमीच्या स्पर्धेसाठी नाशिकहून अनेक सायकलीस्टस सहभागी होत असतात. संपूर्ण भारतात विविध गटात रॅम स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सायकलीस्टसची संख्या सर्वात जास्त आहे. या आधी डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, अॅड. दत्तात्रेय चकोर, अमर मियाजी, अनिल कहार, आनंदा गांगुर्डे, चेतन अग्निहोत्री यांनी सोलो गटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. यापैकी डॉ. महेंद्र महाजन, अॅड. दत्तात्रेय चकोर तसेच डॉ. नितीन रौदळ, विलास इंगळे, शंकर दवांगे, राहुल ओढेकर, मिलिंद वाळेकर, डॉ. कुणाल गुप्ते, मिलिंद धोपावकर हे यावर्षीच्या स्पर्धकांसाठी क्र्यू मेंबर्स म्हणून जात असून यामुळे स्पर्धकांची ताकद व आत्मविश्वास वाढला असून स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांची नाशिकमधून सर्वाधिक असेल असा विश्वास वाढला आहे.

deccan cliffhanger participants nashik cyclists cp ravindrakumar singal
वय वर्षे ६२ असलेले सायकलीस्ट मोहिंदर भराज आणि त्यांच्यासोबत किशोर काळे

या सर्व स्पर्धकांचा हुरूप वाढविण्यासाठी नाशिक सायकलीस्टस कडून सकाळी ६ वाजता रवाना होताना एबीबी सर्कल ते मुंबई नाका अशी विशेष सदिच्छा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी दिली आहे. यावेळी स्पर्धकांच्या वाह्नांपुढे श्रीफळ वाढवून सत्कार करून स्पर्धेसाठी सदिच्छा देण्यात येणार आहेत.

अशी असते डेक्कन क्लीफहँगर…

पुणे ते गोवा अशी ही ६४३ किमीची (४०० मैल) स्पर्धा घेण्यात येते. दर वर्षी ५० हून अधिक सायकलीस्ट यात सहभागी होत असतात. दक्खनच्या पठारावरून सह्याद्रीच्या अवघड वळणांवरून कोकणातील दाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांनी वाट काढत सह्याद्रीच्या उंच कडे आणि तीव्र डोंगर उतार, पुढे समुद्र किनाऱ्याजवळून जाणारा या स्पर्धेचा मार्ग स्पर्धकांची परीक्षा बघत असतो.

सोलो प्रकारात वय १८ ते ४९ आणि वय ५० हून अधिक असलेल्या सायकलपटूने अनुक्रमे ३२ व ३४ तासात ही स्पर्धा पूर्ण केली तर तो रॅम स्पर्धेसाठी पात्र ठरत असतो. भारतात खेळाची संस्कृती रुजावी यासाठी अशा स्पर्धा होणे जरुरीचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.