ylliX - Online Advertising Network

नाशिक सायकलीस्ट करणार सायकल वापरणाऱ्या ‘या’ श्रमिक महिलांचा सन्मान

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे नाशिक शहरात गेल्या १० वर्षांपासून सायकल चळवळ चालविण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवत सायकलिंगचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. घरकाम तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या व या कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या महिलांचा येत्या 14 एप्रिल रोजी सन्मान सोहळा व श्रमिका सायकल रॅलीचे आयोजन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. nashik cyclists shramika rally

अशी असेल श्रमिका सायकल रॅली

श्रमिका सायकल रॅली सकाळी 7 वाजता सुरू होणार असून महात्मा नगर क्रिकेट ग्राउंड ते शांतूषा लॉन्स, गंगापूर रोड असा रॅलीचा मार्ग असेल असेल. या रॅलीनंतर विशेष आमंत्रित श्रमिकांचा सन्मान सोहळा रंगणार असून त्यात त्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

घरकाम करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या अनेक महिला कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. सायकलिंगचा प्रचार करताना प्रामुख्याने या महिलांचा सत्कार होणे गरजेचे असल्याचे लक्षात येताच या श्रमिकांसाठी  रॅली काढण्याचा विचार झाल्याचे नाशिक सायकलीस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी सांगितले. यासाठी गौरी समाज कल्याण संस्थेच्या रोहिणी नायडू यांचे सहकार्य मिळत आहे. nashik cyclists shramika rally

विभागनिहाय दहा प्रमुखांची निवड आणि पदग्रहण : सायकल चळवळीला मिळणार गती

दरम्यान, नाशिकमध्ये सुरु असलेल्या या सायकल चळवळीला गती देण्यासाठी आता पुढचे पाऊल म्हणून दहा विभागात दहा प्रमुख आणि कमिटी काम करेल अशी संकल्पना पुढे आली आहे. शहरातील दहा प्रमुख विभागात एका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली 5 कमिटी मेम्बर्सची टीम काम करेल. या संदर्भात जबाबदारी स्वीकारणाऱ्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांचा पदग्रहण सोहळा श्रमिका रॅली झाल्यानंतर म्हणजेच 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता शांतूषा लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. nashik cyclists shramika rally

पंढरपूर सायकल वारी साठी ऑनलाईन नोंदणी

त्याचप्रमाणे यावेळी नाशिक सायकलिस्ट पंढरपूर सायकल वारी साठी ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार असून नाशिक पेलेटॉनची आयोजन तारीख घोषित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी दिली आहे.

तरी या श्रमिका सायकल रॅली आणि पदग्रहण सोहळ्यात सर्व नाशिक सायकलिस्ट सदस्यांनी जास्तीतजास्त संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

nashik cyclists shramika rally

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.