ylliX - Online Advertising Network

नाशिकच्या सायकलीस्टने पूर्ण केली युरोपातील स्पर्धा, ठरले पहिले भारतीय

भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी पूर्ण केली रेस अराउंड ऑस्ट्रिया, रेस पूर्ण करणारे पहिलेच भारतीय

नाशिक : नाशिकच्या सायकलीस्टने जगभरातील सायकलिंग स्पर्धा जिंकण्याचा जणू धडाकाच लावला असून लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण करत विक्रम केला आहे. रेस अराउंड ऑस्ट्रिया ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय बनले असून नाशिकच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे नाशिक आर्टीलरीच्या स्पेस सेंटरमध्ये एरोनॉटीकल इंजिनिअर असून ब्रेवेट उपक्रमातून त्यांनी रॅन्डोनर सायकलीस्ट आहेत. तर सुपर रॅन्डोनर सायकलीस्ट असलेले दर्शन दुबे हे मूळ नाशिकचे असून नोकरी निमित्ताने ते बंगळूरू येथे असतात. ‘टीम इंस्पायर इंडिया’चे भारत आणि दर्शन यांनी जगभरातील सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्ट्सशी स्पर्धा करत २२०० किमीची शर्यत पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ११७ तासांची वेळ असताना ‘टीम इंस्पायर इंडिया’ने केवळ १०० तासात स्पर्धा पूर्ण केली. केवळ ८ महिन्याच्या प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर या जोडीने हे यश मिळवले आहे.

nashik cyclists bharat pannu and darshan dubey becomes first indians to complete Race around austria

स्पर्धेला रवाना होण्याआधी नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन तर्फे सदिच्छा रालीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारत पन्नू आणि सर्षण दुबे यांनी जसपाल सिंग विर्दी यांनी ब्रेवेट सारख्या राईड्समध्ये सहभागी होण्यासाठी उत्तेजन दिल्यामुळेच हे स्वप्न पाहणे शक्य असल्याचे सांगितले होते. तर दर्शन दुबे यांनी नाशिक सायकलिस्ट्सच्या स्मरणिकेतील डॉ. हितेंद्र महाजन यांच्या ‘टूर डी ड्रॅगन’ आणि ‘रॅम’ या सायकलिंग स्पर्धांबाबतचे अनुभव वाचनात आले. मी त्यांच्या पराक्रमांमधून, त्यांना आलेल्या अनुभवांद्वारे प्रेरणा घेतल्याचे सांगितले होते.

nashik cyclists bharat pannu and darshan dubey becomes first indians to complete Race around austria

६ महिन्याच्या अत्यंत कमी कालावधीत चैतन्य वेल्हाळ यांनी या टीम इन्स्पायर इंडियाला प्रशिक्षण देण्याचे आव्हान स्वीकारले होते. चैतन्य वेल्हाळ हे सर्वात वेगवान भारतीय अल्ट्रा-सायकलस्वार आणि पाहिले प्रमाणित आयर्नमॅन प्रशिक्षक आहेत. त्यांनी ‘आरएए’ स्पर्धा जिंकण्यासाठी आवश्यक असलेला सर्व प्रकारचा सराव टीम इंस्पायर इंडिया कडून करवून घेतला. हे पूर्ण प्रशिक्षण पूर्णपणे वैज्ञानिक तंत्र वापरून त्या आधारित सराव वर्ग घेऊन पूर्ण करण्यात आले होते.

नाशिक शहरातील सायकलीस्टमध्ये जणू जगभरातील सायकलिंग स्पर्धा जिंकण्याची अंतर्गत स्पर्धाच लागल्याचे चित्र आहे. काही दिवसापूर्वीच नाशिकच्या आर्टीलरी सेंटरमध्ये वैद्यकीय सेवेत असलेले डॉ. श्रीनिवास गोकुळनाथ तसेच टीम सह्याद्री सायकलीस्टने जगातील सर्वाधिक कठीण अशी रॅम म्हणजेच रेस अॅक्रोस अमेरिका ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर लवकरच नाशिकचे रॅम स्पर्धा पूर्ण करणारे डॉ. महाजन बंधू आणि सोबत किशोर काळे हे ‘टूर डी ड्रॅगन’ या स्पर्धेसाठी २६ ऑगस्टला रवाना होत आहेत.

काय आहे रेस अराउंड ऑस्ट्रिया?

रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड आणि आव्हानात्मक स्पर्धा आहे. ऑस्ट्रियाच्या सिमेजवळून जाणाऱ्या रस्त्यांनी ही स्पर्धा पूर्ण करावयाची असते. समुद्रसपाटीपासून जास्तीतजास्त १७५०० फूट चढ उतार असलेला रस्ता असून ग्रॉसग्लॉकनेर सारख्या उंच ठिकाणाचाही यात समावेश आहे.
या स्पर्धेसाठी असणारा निर्धारित रस्ता कोणत्याही वाहनांसाठी बंद करण्यात येत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आव्हानात्मक बनते. ही स्पर्धा पूर्ण करणारा स्पर्धक ‘रॅम’ स्पर्धेसाठी पात्र ठरतो.

nashik cyclists bharat pannu and darshan dubey becomes first indians to complete Race around austria

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.