ylliX - Online Advertising Network

नाशिक सायकलीस्टस फाउंडेशन : पत्रकार रॅली उत्साहात

नाशिक सायकलीस्टस फाउंडेशन : पत्रकार रॅली उत्साहात

हा पत्रकारांच्या जीवनातील अमूल्य क्षण : डॉ. भारतकुमार राउत

नाशिक : नाशिक सायकलीस्टस ​फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली पत्रकार सायकल रॅली उत्साहात झाली. यावेळी नाशिकमध्ये मोठ्याप्रमाणात असलेली सायकलीस्टसची संख्या आणि सायकलिंगचे वेड बघता नाशकात सायकलिंग ट्रॅक उभारण्याची विधायक मागणी पुढे येणे स्वाभाविक असून नाशिकमधील पत्रकारांनी एकत्र येत महापालिकेमार्फत शहरात सायकल ट्रॅक उभारावेत असे प्रतिपादन डॉ. भारतकुमार राउत यांनी केले.

Dr.Bharat KUmaar Raut

अशा सायकल रॅलीचे आयोजन सातत्याने व्हावे. पुढील एक वर्षात किमान एक सायकल ट्रॅक उभारण्यात यश मिळाल्यास दर वर्षी पत्रकार दिनी पुन्हा पत्रकार सायकल रॅली साठी नाशकात येईल. असा शब्दही यावेळी डॉ. राउत यांनी दिला. त्याचप्रमाणे समाजातील विविध घटकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्या सर्व घटनांचे वृत्तांकन करण्याऱ्या पत्रकारांसाठी मात्र कुठलाही कार्यक्रम होत नाही. मात्र आजच्या या सायकल रॅली मुळे हे चित्र बदलले असून याबद्दल नाशिक सायकलीस्टसचे अभिनंदन डॉ. राउत यांनी यावेळी केले.

नाशिक शहरातील सर्वच माध्यमातील पत्रकार बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या सायकल राईडचा अनुभव घेतला. यावेळी विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, डिजिटल माध्यम व्यवस्थापनाचे संपादक, युनिट हेड, विभाग प्रमुख, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ. राज नगरकर, नाशिक सायकलीस्टस फाउंडेशनचे मार्गदर्शक आयपीएस अधिकारी हरीश बैजल, अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, शैलेश राजहंस, योगेश शिंदे, वैभव शेटे, श्रीकांत जोशी, डॉ. मनीष रौंदळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. राज नगरकर म्हणाले की, समाजाचा आरसा असणाऱ्या पत्रकार बांधवांनी आपला वसा सांभाळताना आपल्या आणि परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आज हरित आणि अतिशय सुंदर असलेले आपले नाशिक शहर यापुढेही असेच सुंदर व आरोग्यदायी राहील याकडे लक्ष द्यावे असेही डॉ. नगरकर यांनी सांगितले. तर सर्व पत्रकारांचे वतीने देशदूतचे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे यांनी मनोगत व्यक्त केले.

नाशिक सायकलीस्टस फाउंडेशन नाशिक शहरात सायकल चळवळीला बळ देताना विविध उपक्रमांचे आयोजन करत असते. शनिवारी उत्साहात साजरा करण्यात येणाऱ्या दर्पण दिन अर्थात मराठी पत्रकार दिनी पत्रकारांसाठी विशेष आयोजित केलेल्या पत्रकार रॅलीसाठी १०० हून अधिक पत्रकारांनी सहभाग घेतला. मानवता सेंटर ते मुंबई नाका – चांडक सर्कल – गोल्फ क्लब – मायको सर्कल – संभाजी चौक – गोविंद नगर ते मानवता कॅन्सर सेंटर पर्यंतचे अंतर सायकलीस्टसने उप्साहत पार केले. यावेळी नाशिककर सायकलीस्टसला मान देत असल्याचा अनुभव आला आणि हे केवळ नाशिक सायकलीस्टसच्या गेल्या काही वर्षातील प्रयत्नांना आलेले यश असल्याचे काही पत्रकरांनी सांगितले.

यावेळी सहभागी सायकलीस्टस पत्रकारांकारिता घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये दिनेश अमृतकर, मनोज मोरे, रत्नदीप रणशूर यांना जायंट स्टारकेन यांचेकडून सायकल्स भेट देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया, सूत्रसंचालन सुखदा तेलंग तर आभार अॅॅड. वैभव शेटे यांनी मानले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.