ylliX - Online Advertising Network

अपार उत्साहात पार पडला सायकल स्वारांचा रिंगण सोहळा (photo feature)

विठ्ठल चरणी लिन होत सायकल वारीची सांगता

नाशिक : ​नाशिक/पंढरपूर : नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशन आणि दातार कॅन्सर जेनेटक्स लिमिटेड आयोजित नाशिक पंढरपूर सायकल वारीत आज (दि. 15) सायकलचे रिंगण सोहळा अपार उत्साहात पार पडला. विठुरायाच्या जयघोषात तुकारामबाबा खेडलेकर महाराज आश्रमात हा रिंगण सोहळा पार पडला. गेल्या सात वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या सायकल वारीत सलग दुसऱ्या वर्षी रिंगण घालण्यात आले. संपूर्ण महारष्ट्रात फक्त नाशिक येथील सायकलस्वार या प्रकारे सायकलचे अनोखे रिंगन करत आरोग्य चांगले राहावे असा संदेश देतात.

यावर्षी वारीचे प्रमुख आकर्षण असलेल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सायकल रथाने पहिली फेरी पूर्ण करत रिंगण पूर्ण केली. त्यानंतर लहान मुले, महिला आणि त्यानंतर पुरुष सायकलीस्ट्सने रिंगणात फेरी मारली. साधना आणि रवींद्र दुसाने या दाम्पत्याने विठ्ठल रुख्मिणीचा पेहराव करत रिंगणात सहभागी झाले. यावेळी आश्रमात उपस्थित भाविक आणि पायी दिंडीने आ​​लेल्या वारकऱ्यांनी मोठी गर्दी करत सायकलीस्ट्सला प्रोत्साहित केले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी सायकलीस्ट्स वारकऱ्यांमध्येही मोठी उत्सुकता असते. यावेळी पहिल्यांदाच सायकल रथ या रिंगणाची दौड घेणार होता. त्यामुळे त्याचीही उत्सुकता वारकऱ्यांमध्ये होती. रथाभोवतीचा रिंगण सोहळा हा वारकऱ्यांसाठी एक आनंददायी क्षण होता.

रथाने संपुर्ण मैदानाला तीन वेळा गोल रिंगण घालते. हे पाहणाऱ्यांच्या​ ​डोळयांचे पारणे फिटले. यावेळी संपुर्ण आश्रमाचे पटांगण​ ​विठू नामाच्या गजराने दणाणून गेले.​ ​वारीत​ ​गेल्या वर्षीच्या तुलनेत २०० सायकलीस्टस वारकऱ्यांची वाढ झाली आहे.​ सौर सायकल रथाबरोबर​ अध्यक्ष​ ​प्रविणकुमार खाबिया, पालखी सोहळा प्रमुख​ डॉ. मनीषा रौंदळ​, योगेश शिंदे​ यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगणाचा सोहळा पार पडला.

रिंगण करत पुढे सायकल वारी पंढरपूरकडे रवाना झाली. पंढरपुरात पावसाच्या हलक्या सरींनी सायकलीस्ट्सचे स्वागत केले. पंढरपूरमध्ये नामदेव पायरीवर डोके ठेवत विठ्ठलाच्या चरणी लिन होत सायकलीस्ट्स वारकऱ्यांनी आपल्या इच्छा विठ्ठलाकडे व्यक्त केल्या.

13 ते 15 जुलै दरम्यान केवळ तीन दिवसात नाशिक ते पंढरपूर सायकल वारी पूर्ण करत आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देताना ही वारी 100% प्लास्टिकमुक्त स्वरूपात तडीस नेण्यात आली​.​ ही नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनसाठी जमेची बाजू ठरली आहे. मागीलवर्षाप्रमाणे अन्न नासाडी रोखण्यात 100% यश आले.

नाशिक सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबवत प्लास्टिकचा न वापर करता, रस्त्यांमध्ये विविध ठिकाणी एक हजार वृक्षारोपण करून वारी पूर्ण केली. नाशिक ते पंढरपूर इको सायकल दिंडीच्या माध्यमातून तीन दिवसात 360 किमीचे अंतर पार करीत पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेतले. आजचा सर्व सायकलीस्ट्स बस आणि खाजगी वाहनांनी परतीचा प्रवास करत नाशिक गाठले.

सायकल ​वारी यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव नितीन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. वैभव शेटे, योगेश शिंदे,​ ​राजेंद्र नाना फड, ​मोहन देसाई, ​यश देसाई​आदींनी प्रयत्न केले. पुढीलवर्षी वारी अधिक उत्साहाने वेगवेगळे प्रयोग करत आयोजित करण्याचा मानस नियोजन समितीने केला आहे.​

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.