ylliX - Online Advertising Network

nashik crime murder मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव अन् डॉक्टर मुलाची हत्या

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस Retired Registrar Nanasaheb Ravji Kapdanis (वय-70) आणि त्यांचा मुलगा अमित कापडणीस Amit Kapdanis (वय-35 दोघे रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी) यांचा मागील डिसेंबर महिन्यात दोन टप्प्यात निर्घृण खून (Brutal Murder) करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उलघडा करण्यात नाशिक पोलिसांना (Nashik Police) यश आले आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) या प्रकरणात एका व्यावसायिकाला अटक (Arrest) केली आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या जिल्ह्यात नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला.nashik crime murder

पिता-पुत्रांच्या हत्येप्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) व्यावसायिक राहुल गौतम जगताप Rahul Gautam Jagtap (वय-36 रा. आनंद गोपाळ पार्क) याला बुधवारी (दि.16) अटक केली आहे. पोलीस उपायुक्त अमोल तांबे (DCP Amol Tambe) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापडणीस पिता-पुत्र हे  शरणपूर रोडवरील जुन्या पंडित कॉलनीमध्ये एकटेच राहत होते. त्यांची पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त मुंबईत (Mumbai) राहत होते. अमित याने एम.बी.बी.एस (MBBS) केले असून तो कोणतीही वैद्यकीय प्रॅक्टिस (Medical Practice) करत नव्हता.

कापडणीस हे राहत असलेल्या आनंद गोपाळ पार्क अपार्टमेंटमध्ये (Anand Gopal Park Apartment) आरोपी राहुल जगताप हा देखील राहत होता. त्याने पिता-पुत्रांवर वॉच ठेवून अमित सोबत मैत्री केली. यानंतर आरोपीने त्यांच्या स्थावर मालमत्ता (Real Estate), जंगम मालमत्ता, बँक, शेअर मार्केट (Stock Market), डिमॅट खात्यातील (Demat Account) गुंतवणुकीबाबत (Investment) सर्व माहिती जाणून घेतली. त्यांच्याकडे गडगंज संपत्ती असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने पिता-पुत्रांची हत्या करण्याचा कट रचला.

दरम्यान, कापडणीस यांची पत्नी या नाशिकमध्ये असलेल्या पिता-पुत्रांच्या संपर्कात नव्हत्या. कापडणीस यांची मुलीगी शितल हिने भाऊ अमित याला संपर्क साधला मात्र त्याचा फोन लागत नाही.तर वडिलांचा फोन दुसराच कोणत्यातरी व्यक्तीकडे असल्याचे तिच्या लक्षात आले.मुलीने फोन केल्यानंतर समोरचा व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने मुलीने नाशिक गाठले.त्यावेळी तिने वडिलांना फोन केला तर तो फोन संशयित राहुल याने उचलला आणि शितलची भेट घेतली.त्यावेळी राहुल याने घराचे काम सुरु असल्याने तुमचे वडिल व भाऊ हे देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील रो-हाऊसमध्ये राहण्यास गेल्याचे सांगितले.

राहुल बोलण्यावर विश्वास ठेवून शितल ही पुन्हा मुंबई येथे निघून गेली.त्यामुळे कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत उशिराने पोहचली असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

===========================================================

नानासाहेब कापडणीस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव तर मुलगा अमित कापडणीस एमबीबीएस पदवीधारक होता. त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.आणि यांचाच खून केलाय तो अवघ्या महिनाभराच्या आत ओळख झालेल्या जवळच राहणाऱ्या राहुल जगताप याने.. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी साधारण आठवडाभराच्या अंतरावर राहुल जगताप याने खून केले होते. विशेष म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन्हीही मृतदेह वेगेवेगळ्या जिल्ह्यात फेकून दिले होते. नानासाहेब कापडणीस यांचा पालघर जिल्ह्यात तर मुलाचा मृतदेह नगर जिल्ह्यात. हे प्रकरण इथवरच थांबले नाही तर राहुल जगताप याने कापडणीस यांचे व्यवहार हाताळत मालमत्ता हडप करण्याचा पराक्रम सुरू केला होता. कापडणीस यांचे सुरू असलेले बांधकाम आणि त्याचा व्यवहार तर मोबाइलमध्ये असलेले शेयर मार्केट, बँक खाती हे सुद्धा हाताळत लाखो रुपये हडपण्याचे काम सुरू केले होते.मयत यांचे नातेवाईक म्हणजेच आई आणि बहीण हे अमेरिकेत राहतात ते वर्षानुवर्षे येणार नाहीत. त्यामुळे सगळ काही हडप करत स्वतः नानासाहेब कापडणीस आहे म्हणून राहुल जगताप याने सुरुवात केली होती. मात्र मुंबईतच राहत असलेले आई आणि बहीण यांनी वडिलांना आणि मुलाला कॉल केले मात्र संपर्क न झाल्याने नाशिकमध्ये येऊन बघितले होते. मात्र संपर्क न झाल्याने ते पोलिसांना न कळविताच निघून गेले होते. नंतर मात्र महिना उलटून गेला काहीच संपर्क होत नसल्याने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आणि मग काय कानून हात बहोत लंबे होते है.दोन जिल्ह्यात फेकून दिलेल्या मृतदेहासह टेक्निकल गुन्ह्याची उकल केलीय. फक्त आणि फक्त मयतांचे झालेले व्यवहार हाच धागा धरून नाशिक पोलिसांनी ही कामगिरी केलीय..nashik crime murder

आरोपी राहुल जगताप याने करोडो रुपयांच्या संपत्तीवर डोळा ठेऊन आत्तापर्यंत लाखों रुपये हडप केले होते. अनेक मालमत्ता जप्त करण्याचे कामही सुरू केले होते. इतकंच नव्हे तर महागडी गाडी देखील खरेदी केली होती. मयतांच्या नावावर नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मयतांचे अर्धे कुटुंब हे मुंबईत राहतात, त्यांचा फारसा नाशिकमध्ये असलेल्या व्यक्तींशी संपर्क नसल्याचे पोलिस सांगताय. तर आरोपीनेही लाखों रुपये हडप केले असले तरी हॉटेल्स, बंगला आणि महागड्या गाड्या खरेदी करण्यास सुरुवात केली होती. डिसेंबरमध्ये झालेला खून, जानेवारीत मिसिंगची तक्रार आणि फेब्रुवारीत गुन्ह्याची उकल हा सगळा घटनाक्रम पोलिसांनाही चक्रावून टाकणारा आहे. त्यातच आत्तापर्यंत आलेली संपूर्ण माहिती चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. त्यामुळे येत्या काळात पोलिस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आल्याने या घटनेत नवनवे ट्विस्ट येण्याची मोठी शक्यता आहे. nashik crime murder

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.