ylliX - Online Advertising Network

Nashik crime girl abuse अंबड परिसरात 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार; नागरिकांत संतापाची लाट

सिडको : नाशिक शहराच्या कामगार वस्ती असलेल्या अंबड परिसरात26 वर्षीय नराधमाने 7 वर्षीय बलिकेवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार घडला आहे. देशभरात हैदराबाद, उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांवरून आक्रोश असताना ताज्या असतानाच नाशिक मधील या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी संशयित नराधमाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी अंबड पोलिसात कलम 376 आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik crime girl abuse )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड परिसरसतील महालक्ष्मी नगर येथे काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी आपल्या दोन मुलींसह रहायला आले आहे. याठिकाणी आधीच रहात असलेल्या कैलास रामू कोकणी (२६) याने सात वर्षीय मुलीला खेळण्याच्या निमित्ताने गच्चीवर घेऊन गेल्यानंतर खाऊचे आमिष दाखवून तिला तो रहात असलेल्या खोलीत घेऊन गेला. घरात कुणीही नसतांना त्याने दरवाजा आतून बंद करून बलिकेवर बळजबरीने अत्याचार केला.

काही वेळातच मुलीच्या आईने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्याचवेळी जवळच असलेल्या संशयिताला विचारण्यासाठी मुलीच्या आईने हाक मारली असता संशयिताने घाबरून बराचवेळ दरवाजा उघडला नाही. यावेळी शेजाऱ्यांनी त्याला दरवाजा उघडण्यास भाग पाडले असता बलिकेच्या अंगावर कपडे नसल्याचे आढळून आले. घरी गेल्यानंतर भेदरलेल्या मुलीने आईला माहिती दिल्यावर घडलेला प्रकार उघडकीस आला.

यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी संशयित कैलास कोकणी यास येथेच्छ चोप देत पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी अंबड पोलिसात रात्री उशिरापर्यंत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कैलास कोकणी हा महिंद्रा कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत असून गेल्या अनेक वर्षांपासून येथेच रहात असल्याची माहिती मिळाली आहे.एकीकडे हैदराबाद, उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांनी देश ढवळून निघालेला असतांनाच शहरात घडलेल्या घटनेने संतापात भर पडलीय.Nashik crime girl abuse

आरोपीचा व्हिडियो
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.