ylliX - Online Advertising Network

कर्मचाऱ्यांचे कपातीचे बनावट प्रकरणे सादर करत आयकर विभागाला तब्बल १७ कोटींचा गंडा

औद्योगिक वसाहतीतील दहा कंपनी आणि निमसरकारी विभागातील सुमारे १,८८८ कर्मचाऱ्यांचे कपातीचे बनावट प्रकरणे सादर करत अॉनलाईन परताव्याचे पैसे घेत सॉफ्टवेअर इंजिनियरने आयकर विभागाला तब्बल १७ कोटींना फसवले आहे. नियोजनबद्ध पद्धतीने तीन वर्षे हा भामटा आयकर विभागाला फसवत आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

यामध्ये शासकीय कर्मचारी सोबत औदयोगिक क्षेत्रातील कामगारांवरही गुन्हे दाखल होणार आहेत. पोलिसांनी अधिक माहिती दिली की, फसवणूकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर धनराज किसन बोराडे (वय ४६, रा. शुभसिद्धी अपार्टमेंट, राजलक्ष्मी हॉलजवळ, धोंगडे मळा, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात किशोर रामचंद्र पाटील (रा. फ्लॅट नंबर २०१, शकुंतला पार्क, संभाजी चौक, नाशिक) याच्याविरूद्ध भा. दं. वि. कलम ४०६, ४२०, ४६५, ४७१ व १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हायातील महत्वाच्या बॉश, सिएट, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, ग्राफाईट, गायत्री पेपर कंपन्या सोबत सरकारी कंपनी असलेल्या इंडिया सिक्युरीटी प्रेस, करन्सी नोट प्रेस, वीज वितरण, एचएएल या शासकीय कार्यालयातील एकूण एक हजार ८८८ कर्मचाऱ्यांची बनावट प्रकरणे सादर केली आहेत. या भामट्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अॉनलाईन परताव्याचे पैसे घेत फसवले आहे.

या प्रकरणात साल २०१६, २०१७, २०१८ व २०१९ या सर्व वर्षाचे स्वतंत्र आयकर विवरणपत्र तयार करत आयकर कायद्याच्या गृहसंपत्तीपासून नुकसान प्रकरण ६ ए चे ८० सी, ८० डी, ८० डीडी, ८० ई, ८० जी, ८० जीजी कलमांखाली कटकारस्थान रचले होते. तर ऑनलाईन एनओसी सीपीसी बेंगळुरू येथे दाखल केली.

या नुसार कर्मचार्‍यांच्या नावे शासनाकडून साधारणत: १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपये मूळ परतावे व्याजासह घेतले होते. तर त्याने रक्कम हडप करत शासनाची फसवणूक केली आहे. तर कर्मचार्‍यांकडून परतावा रकमेच्या २० टक्के रक्कम फी म्हणून रोख स्वरूपात स्वीकारली.तर कर्मचार्‍यांच्या वेतनातून मिळणार्‍या उत्पन्नामध्ये फेरफार करत कमी वेतन दाखवले यात आयकर विभाग तसेच कर्मचाऱ्यांना फसवले आहे.

यामध्ये आरोपी असलेला किशोर पाटील याने अनोखी पद्धतीने हे सर्व पैसे अपहार केला आहे. यामध्ये त्याने शासन, कामगार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना फसवले आहे. जर रक्कम व्याजासह परत करण्याचे तसेच वेळ पडल्यास तीन पट दंड भरण्याची वेळ आता या फसवणूकीने कर्मचाऱ्यांवर आली असून, संशयित किशोर पाटील हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.